हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट इतिहासात असे अनेक क्रिकेटपटू होऊन गेले आहेत ज्यांनी आपल्या मैदानावरील अद्भुत कामगिरीने संघाला जिंकून दिले आहे. तसेच अनेक चांगले चांगले खेळाडूही त्यांच्यासमोर चाचपडत असत, पण जेव्हा ते खेळाडू निवृत्त होतात तेव्हा सर्वजण त्यांना विसरतात. अगदी कुटुंब चालविण्यासाठी त्यांना क्रिकेट सोडून काहीतरी वेगळे करावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोलंदाजाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याची गोलंदाजीवर सचिन तेंडुलकर सारखा आघाडीचा फलंदाजही खुलून खेळू शकला नाही. त्याने सचिनला दोनदा बाद केले, त्याने आपल्या टीमला चार वेळा भारताविरुद्ध विजयही मिळऊनदिलेला आहे, तर आज तो गोलंदाज टोमॅटो विकतो आहे.
इडो ब्रॅन्डिसची गोष्ट
आम्ही बोलत आहोत झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज इडो ब्रॅन्डिसविषयी जो आपल्या देशासाठी १० कसोटी सामने आणि ५९ एकदिवसीय सामने खेळला आहे. ब्रॅन्डिसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही आणि त्याने ९६ बळी घेतले. पण इतक्या कमी वेळात त्याची प्रतिमा चांगली गोलंदाजीची होती. त्याने विशेषतः भारताविरुद्ध अत्यंत किफायतशीर गोलंदाजी केली. ब्रॅन्डिसने सचिनला दोनदा बाद केले आणि हा गोलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाने भारताविरुद्ध चार विजय नोंदवले. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या वन-डे मालिकेमध्ये इडो ब्रॅन्डिसने आपल्या गोलंदाजीने भारताला नामोहरम केले होते . या सामन्यात ब्रॅन्डिसने ९.५ षटकांत ४१ धावा देऊन ५ गडी बाद केले होते.
ब्रॅन्डिस शेतकरी झाला
इडो ब्रॅन्डिसने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९९९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता आणि त्यानंतर तो कधीही क्रिकेटच्या मैदानात परतला नाही. एवढेच नव्हे तर ब्रॅन्डिसने झिम्बाब्वेलाही सोडले आणि तो ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला. ऑस्ट्रेलिया गाठल्यानंतर तो ६ वर्षे एका क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होता. सनशाईन क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना त्यांनी पहिल्यांदाच ब्रिस्बेन क्रिकेट स्पर्धा आपल्या संघाला जिंकून दिली. यानंतर, ब्रान्डिसने कोचिंग देखील सोडले.
कोचिंग सोडल्यानंतर इडो ब्रॅंड्सने शेती करण्यास सुरवात केली. ब्रॅन्डिसने सनशाईन कोस्टवर टोमॅटोची लागवड केली आणि यामध्ये त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक इयान हिली याने सहाय्य केले. हिलीने ब्रिस्बेनमधील अनेक ब्रँडच्या लोकांशी संपर्क साधला. आज ब्रॅन्डीस आठवड्याला १०० टन टोमॅटो उगवतो आणि ते विकून नफा कमावतो. ब्रॅन्डिस बर्याच लोकांना त्याच्याबरोबर काँट्रॅक्टमध्ये ठेवततो. ब्रॅंडेस आणि त्याचे कुटुंब झिम्बाब्वेमध्ये चिकन फार्म देखील चालवत असत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.