स्टेट बँकेच्या एटीएमला आग लावल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून खुलासा

रभणी येथे दोन दिवसापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली होती. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या प्रकरणांमध्ये आता नवीन खुलासा झाला असून या खुलाशाने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उन्नाव सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच जणांनी पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. यात ती ९० टक्के भाजली होती. सफदरजंग रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कळमनुरीमध्ये हुंड्याच्या लोभाने जावयाने केली मेव्हण्याची निर्घृण हत्या

कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे हुंड्याच्या रकमेच्या वादातून जावयाने आपल्या सख्ख्या मेव्हण्याचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संतोष शंकर डांगे (१४) असं मयत मेव्हण्याचे नाव असून तात्याराव जगदेवराव सूर्यवंशी असं आरोपी जावयाचं नाव आहे.

संवेदनशील प्रकरणात माध्यमांनी आततायीपणा करु नये – पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार

अवघ्या देशभरात लोकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या तेलंगणातील सामूहिक बलात्काराच्या केसचा निकाल शुक्रवारी सकाळी पोलिसांनी एन्काउंटर करून लावून टाकला. पोलीस प्रमुख व्ही.सी.सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली राबविल्या गेलेल्या या मोहिमेत चारही आरोपींना पोलिसांवर हल्ला केल्याच्या कारणास्तव गोळ्या घालून मारण्यात आलं.

सरसकट एन्काउंटरच्या नावाखाली दिवाळी साजरी करणे चुकीचे – नीलम गोऱ्हे

हैदराबादमधील २६ वर्षीय डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. त्यानंतर सर्वस्तरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. परंतु ”या प्रकारणातील आरोपी हे खरे होते की नाही हे न्याय पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होते त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी” असे मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.

तेलंगणा मुख्यमंत्र्याना युजरने दिला होता सल्ला, झाला तसाच एन्काऊंटर; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटर वर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता. अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे. युजरने मुख्यमंत्र्यांना सल्ल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्याने म्हटले होते की, आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथं काय झालं ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला असा सल्ला युजरने दिला होता. आता संबंधित अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उदयनराजेंनी केलं तेलंगणा पोलिस दलाचे या शब्दांत अभिनंदन

मागील काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून त्या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. हा क्रूरतेचा कळस जेंव्हा उघडकीस आला त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत तातडीने आरोपींना अटक केली होती. मात्र आता  या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

हैदराबाद पोलिसांना शाब्बासकी देत सरकारने क्लीन चिट दिली पाहिजे- आमदार प्रणिती शिंदे

आज सकाळी हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर केला. त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलिसांच अभिनंदन केलं आहे. विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या कारवाईचे समर्थन केलं असताना सरकारने त्या पोलिसांच्या पाठीशी उभ राहून पोलिसांना क्लीन चिट दिली पाहिजे. असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ”या पुढे बलात्काऱ्यांचा थर्ड डिग्री टॉर्चर करून एन्काउंटर करायला पाहिजे आणि या केस मधील फाईल लवकरात लवकर क्लोज करुन पोलिसांना शाब्बासकी दिली पाहिजे” असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

लग्नाचा बनाव करून व्यापाऱ्यास ६ लाखाचा गंडा, ७ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

एका उच्चशिक्षित तरुणीबरोबर लग्न लावण्याचा बनाव करत, बनावट पालक व खोटी कागदपत्रे तयार करून ७ जणांच्या टोळीने येथील एका कापड व्यापाऱ्याची सोने, चांदी आणि रोख रकमेसह ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कापड व्यापारी भैरूलाल शांतिलाल भंडारी (वय ३५, आझाद चौक) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.