हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सिंधुदुर्गचे माजी खासदार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांच्यावर ट्विटर च्या माध्यमातून टीका केली आहे.या टीकेत नाईकांना निलेश राणे यांनी चक्क बैलाची उपमा दिली आहे.
नेमकं काय म्हणाले राणे :
बैल वैभव नाईक परत एकदा विधानसभेच्या दरवाजावर बाजूला फेकला गेला. मुख्यमंत्री ठाकरे आत येताना विधिमंडळाच्या दरवाजावर दरबान सारखा नमस्कार करायला उभा राहणार्या वैभ्याला मुख्यमंत्र्याच्या बॉडीगार्डने बाजूला फेकलं. कचऱ्याची पण जास्त किंमत असेल वैभ्या पेक्षा.
बैल वैभव नाईक परत एकदा विधानसभेच्या दरवाजावर बाजूला फेकला गेला. मुख्यमंत्री ठाकरे आत येताना विधिमंडळाच्या दरवाजावर दरबान सारखा नमस्कार करायला उभा राहणार्या वैभ्याला मुख्यमंत्र्याच्या बॉडीगार्ड ने बाजूला फेकलं. कचऱ्याची पण जास्त किंमत असेल वैभ्या पेक्षा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 1, 2021
निलेश राणे हे टीका करताना नेहमीं काय शब्द वापरतील याचा नेम नाही. संजय राऊत यांना संज्या तर आता वैभव नाईक यांना बैल आणि वैभ्या असे त्यांनी संबोधले आहे. सोबत च कचऱ्याच्या किमतीचा असेही म्हटले आहे. यावर वैभव नाईक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.