आता शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्याचा नंबर; किरीट सोमय्या यांनी केला गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणी अखेर वनमंत्री संजय राठोड यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. हो – नाही,हो – नाही करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संजय राठोड यांचा राजीनामा घेतलाच.

राठोड यांच्या राजीनाम्या मागे विरोधी पक्ष भाजपने केलेला पाठपुरावा या सगळ्याला कारणीभूत ठरला आहे.तसेच नुकतेच विधानसभेचे अधिवेशन देखील सुरू झाले आहे.अशा वेळेला नसती उठाठेव करण्यापेक्षा राठोड यांनी राजीनामा दिलेलाच योग्य असे शिवसेना पक्ष नेतृत्वाला वाटले आणि त्यांनी राजीनामा घेतला अशी माहिती एका सेना नेत्याने दिली.

पण त्याचबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकताच एक ट्विटर बॉम्ब टाकलाय.त्यात त्यांनी म्हटलंय की ” एक विकेट तर गेलीच पण आता दुसऱ्या विकेटीसाठी तयार रहा.मी लवकरच म्हणजे येत्या दोन दिवसांत कागदपत्रांसह पुन्हा एका शिवसेना नेत्याला एक्सपोज करणार आहे.त्यामुळे तयार रहा. अशा आशयाचं ट्विट सोमय्या यांनी केलं आहे. आता हा नवीन भ्रष्टचारी नेता कोण ? हे अजून गुलदस्त्यात आहे.पण येत्या दोन दिवसात ते कळेलच.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like