हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या कामात प्रभुत्व मिळवते आणि नेमके तेच काम करण्यात जेव्हा ती अपयशी ठरते तेव्हा त्या व्यक्तीला सर्वात जास्त लाज वाटते. तुम्ही देखील आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं पाहिली असतील पण तुम्ही कधी कोणत्या प्राण्याला अशाप्रकारे लाज वाटल्याचे पहिले नसेल. आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, प्राणी देखील अपयशी ठरल्यावर लाजतात आणि ते मनुष्यांसारखेच वागतात. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक व्यक्ती एका मगरीला माशाचा तुकडा भरवण्याचा प्रयत्न करीत आहे. एक मुलगी देखील त्या व्यक्तीच्या जवळ उभी आहे.
जेव्हा मगर त्या व्यक्तीच्या हातातला मांसाचा तुकडा पाहतो तेव्हा ते खाण्यासाठी त्याच्याकडे पहातो. मग ती व्यक्ती मगरीच्या तोंडात वरून मांसाचा तुकडा टाकते. पण मगरीचा अंदाज चुकला आणि मांसाचा तुकडा तोंडात न पडता जमिनीवर पडतो. मगर यामुळे कदाचित खूपच लाजली असेल त्यामुळे तो मांसाचा तुकडा न खाता ती पाण्यात गेली. त्यानंतर ती व्यक्ती त्या मांसाचा तुकडा मगरीला भरवण्याचा पुन्हा प्रयत्न करते मात्र यावेळी मगर पाण्यामधून बाहेरच येत नाही. हा एक जुना व्हिडिओ आहे जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
मगर मांसाचा तुकडा पकडण्यात अपयशी ठरली
हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. वास्तविक, हा व्हिडिओ देखील वेगळा आहे कारण यामध्ये असे दिसून येते की, मांसाचा तुकडा पकडण्यात अपयशी ठरल्या नंतर मगर लज्जास्पदपणे पाण्याकडे परत जाते. हा व्हिडिओ फ्लोरिडाच्या एव्हरग्लाइड्स हॉलिडे पार्कमधून घेण्यात आला आहे आणि व्हिडिओमध्ये दिसलेल्या मगरीचे नाव सेवन आहे. व्हिडिओ gatorboys_chris नावाच्या खात्यावर इंस्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. याच्या, कॅप्शन मध्ये लिहिलेले आहे, सेवन किती क्यूट आहे. मांसाचा तुकडा तोंडात पकडण्यात अयशस्वी ठरल्याने ती लज्जास्पद स्थितीत निघून गेली.
जमिनीवर पडला तुकडा
त्या व्यक्तीने लिहिले की, मी सेवनला खायला देताना एक व्हिडिओ बनवित होतो, मात्र तो खूपच मजेशीर असल्याचे सिद्ध झाले. व्हिडिओमध्ये, मगर पाण्याबाहेर येताना दिसत आहे आणि एक माणूस त्याच्या तोंडाजवळ चिकनचा तुकडा नेतो. ती चिकन खाण्याचा प्रयत्न करते, मात्र चिकनचा तुकडा तिच्या तोंडात येत नाही. या प्रयत्नात तो तुकडा जमिनीवर पडते आणि त्यानंतर ती पाण्यात परत जाते. शेवटी बरीच समजूत घातल्यानंतर ती पाण्याच्या काठावर आपले खाद्य घेण्यासाठी येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.