कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?

0
42
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्‍या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये पेट्रोल 5 रुपयांपेक्षा महाग झाले आहे. मात्र, असे तज्ञांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर एक लिटर पॅकेजिंग केलेल्या पाण्याच्या बाटलीपेक्षा पेट्रोल स्वस्त आहे. त्याच वेळी मात्र देशातील पेट्रोलच्या किंमती या गेल्या 21 महिन्यांतील सर्वाधिक पातळीवर गेलेले आहेत.

व्हीएम पोर्टफोलिओचे संशोधन प्रमुख विवेक मित्तल यांनी एका न्यूज वाहिनीशी बोलताना सांगितले की, सरकारने मार्चमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईड ड्युटी प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढविली आहे. यानंतरही तेल कंपन्यांनी किंमतीवरील कर वाढविला नाही. म्हणूनच ते दररोज पेट्रोलच्या किंमती वाढवत आहे. याशिवाय लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अचानक पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढली आहे. रुपया घसरल्यामुळे तेल कंपन्यांची चिंताही वाढली आहे. लॉकडाऊन दरम्यान तेल कंपन्यांचे नुकसान झाले आता ते त्यासाठी तयार होत आहे.

पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त
सध्या, प्रति बॅरल एक लिटर क्रूड तेलाची किंमत 39 डॉलर आहे. एका बॅरलमध्ये 159 लिटर असतात. अशा प्रकारे एका डॉलरची किंमत 76 रुपये आहे. या संदर्भात एका बॅरलची किंमत 2964 रुपये आहे. त्याच वेळी, जर आपण लिटरमध्ये बदलले तर त्याची किंमत 18.64 रुपये आहे. तर देशातील बाटलीबंद पाण्याची किंमत 20 रुपयांच्या जवळपास आहे.

गेल्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेल 5 रुपयांनी महाग झाले
तेल कंपन्यांनी 7 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवायला सुरुवात केली. आतापर्यंतच्या दहा दिवसांत पेट्रोलच्या दरात 5.47 रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 5.80 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र, अशी अपेक्षा आहे की येत्या दोन आठवड्यात वाढ झाल्याने प्रतिलिटर 60 पैसे दिलासा मिळू शकेल. तेल मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार मे महिन्यात तेलाचा एकूण वापर 1.465 दशलक्ष टन्स होता जो एप्रिलच्या तुलनेत 47.4 टक्के जास्त आहे. इंग्रजी वेबसाइट टाईम्स ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, पेट्रोलचे दर हे गेल्या 21 महिन्यांच्या वरच्या पातळीवर पोहोचले आहेत.

पेट्रोल-डिझेल महाग का होत आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तज्ज्ञांचे यावर म्हणणे आहे की, पेट्रोलच्या किंमती अनेक गोष्टींमुळे ठरविल्या जातात. त्यामध्ये एक कच्चे तेल हे देखील आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किंमतींमध्ये मोठी घसरण असूनही, भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती त्या प्रमाणात कमी का होत नाहीत? याची दोन मोठी कारणे आहेत.

पहिले कारण म्हणजे भारतातील पेट्रोल आणि डिझेलवरील जास्तीचा टॅक्स. त्याच बरोबर दुसरे कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत, एक्स फॅक्टरी किंमत किंवा बेस प्राइस 22.11 रुपये आहे. यामध्ये केंद्र सरकारला उत्पादन शुल्क म्हणून 32.98 रुपये, मालवाहतुकीवर 33 पैसे, डीलर कमिशनला 3.60 पैसे आणि राज्य सरकारचे व्हॅट 17.71 रुपये दिले जातात. राज्य सरकारही डीलर कमिशनवर व्हॅट लावते. त्यामुळे एकूण पेट्रोलची किंमत ही 76.73 रुपये झाली.

दुसर्‍या कारणाबद्दल म्हणजेच रुपयाच्या घसरणीबद्दल बोलूया. अर्थव्यवस्थेत झालेल्या सततच्या घसरणीमुळे आपला रुपयाही कमकुवत होत आहे. डिसेंबर 2015 मध्ये आपण एका डॉलरसाठी 64.8 रुपये द्यायचे. पण आता ते 76 रुपयांपेक्षा जास्त झाले आहे तसेच आता 15 टक्के जास्त दर द्यावा लागतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय क्रूड आपल्यासाठी स्वस्त असूनही महाग होत आहे आणि ते परकीय चलन साठ्यांसाठी एक ओझे बनून राहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here