हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून देशात आणि राज्यातही मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा देशात कडक संचारबंदी जाहीर होईल का अशी भीती नागरिकांमध्ये असतानाच व्हाट्स अप तसेच सोशल मिडीयावर एक मेसेच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये १५ जूननंतर संचारबंदी पुन्हा लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हे सत्य नसून अफवा असल्याचा खुलासा सरकारकडून करण्यात आला आहे.
या व्हायरल मेसेजमुळे अनेक नागरिक संभ्रमात आहेत तसेच चिंताग्रस्त झाले आहेत. अनेकांनी ट्रेन तसेच विमानाची तिकिटे बुक केली आहेत. पुन्हा संचारबंदी जाहीर होऊन पुन्हा वाहतूक बंद होणार असल्याच्या या मेसेजमुळे हे नागरिक त्रस्त झाले आहेत. ’15 जून के बाद फिर से हो सकता है संपूर्ण लॉकडाउन. गृह मंत्रालय ने दिये संकेत, ट्रेन और हवाई सफर पर लगेगा. ब्रेक कोरोना की बढ़ती रफ्तार के बाद लिया गया फैसला ‘ अशाप्रकारचा हा मेसेज आहे. मात्र हा मेसेच अफवा असल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही आहे.
दावा: सोशल मीडिया पर फैलाई जा रही एक फोटो में दावा किया जा रहा है कि गृह मंत्रालय द्वारा ट्रेन और हवाई यात्रा पर प्रतिबंध के साथ 15 जून से देश में फिर से पूर्ण लॉकडाउन लागू किया जा सकता है।#PIBFactcheck– यह #Fake है। फेक न्यूज़ फैलाने वाली ऐसी भ्रामक फोटो से सावधान रहें। pic.twitter.com/DqmrDrcvSz
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 10, 2020
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अर्थात पीआयबी ने हा मेसेच खोटा असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी लोकांना अशा खोट्या मेसेजपासून सावध राहन्यासाचे आवाहन ही केले आहे. यावरून १५ जूननंतर पुन्हा संचारबंदी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.