मुद्रा शिशू कर्जाच्या व्याजावर सरकार देतेय १५०० करोड रुपयांची मदत; जाणुन घ्या कसा मिळवायचा फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी माहिती देताना सांगितले की, सरकार मुद्रा शिशु योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी व्याजदरामध्ये २% सूट देईल. २० लाख कोटींच्या स्वावलंबी भारत आर्थिक मदत पॅकेजच्या दुसर्‍या हप्त्याचा हा एक भाग होता आणि त्यामध्ये शेतकरी, स्थलांतरित कामगार तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेते यांचा समावेश करण्यात आला.

शेतकऱ्यांना सवलतीची कर्जे, रस्त्यावरील भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी कर्जे आणि स्थलांतरित मजुरांना मोफत अन्नधान्य यासह अनेक नवीन उपायांचे अनावरण अर्थमंत्र्यांनी यावेळी केले. आर्थिक मंदीमुळे फटका बसलेल्या समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्यासाठीचे सरकारचे हे प्रयत्न होते.

Pradhan Mantri Mudra Yojana: Introduction & Eligibility | Pixr8

मुद्रा शिशु कर्जाबद्दल महत्वाच्या गोष्टी येथे जाणून घ्या:

मुद्रा योजना म्हणजे काय ?
२०१५-१६ मध्ये, एनडीए सरकारने लहान कंपन्यांपर्यंत पतपुरवठा करण्यासाठी तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) जाहीर केली. मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (मुद्रा) ही बँकांनी आणि इतर कर्ज देणाऱ्या संस्थांकडून लघु कर्जदारांना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आली.

या योजनेंतर्गत शिशु, किशोर व तरुण या तीनही प्रकारांत १० लाख रुपयांपर्यंतची कोलेटरल फ्री कर्जे दिली जातात. ‘किशोर’ योजनेमध्ये ५०,००१ ते ५ लाख रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात. यामधील तिसरी श्रेणी ही ५-१० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीची आहे.

या निर्णयामुळे मुद्र शिशु कर्जाअंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतच्या लहान कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. यामुळे कर्जदारांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम झाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण काय म्हणाल्या ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी सांगितले की, सरकारी मुद्रा शिशु योजनेंतर्गत जे लोक वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांना पुढील १२ महिन्यांच्या कालावधीसाठीच्या व्याजदरात २% सूट देण्यात येईल. या योजनेचा फायदा ३० दशलक्षाहून अधिक लोकांना होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक मदत पॅकेजअंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांचा हा दुसरा भाग होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment