हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सूचना दिल्या आहेत की ज्यांचे खाते आधीच कॅश किंवा ओव्हरड्राफ्टमार्फत क्रेडिट सुविधेसह सुरु आहेत अशा ग्राहकांची करंट बँक खाते उघडले जाऊ नये. या निर्णयामुळे बँकांना मदत होईल, असा विश्वास करण्यात आला आहे. कारण, यामुळे अनेक बँक खात्यांमधून कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्यांना आळा घालण्यास मदत होईल. कर्जासाठी असलेल्या विविध खात्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी RBI ने हे नवीन उपाय सुचविले आहेत.
करंट अकाउंटला चालू खाते देखील म्हटले जाते. हे खाते कंपनी किंवा व्यावसायिकांसाठी आहे. जिथे त्यांना दररोजच्या पैशांचे व्यवहार करणे आवश्यक असतात तसेच जिथे पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात, असे लोक चालू खाते वापरतात.
RBI चा करंट अकाउंटबाबत नवीन आदेश- आरबीआयच्या नवीन सूचनांनुसार कोणतीही बँक ज्या ग्राहकांनी बँकिंग सिस्टममधून कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टच्या रूपात क्रेडिट सुविधेचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी आता करंट अकाउंट उघडले जाणार नाही.
मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व व्यवहार कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खात्यातून केले जातील. रिझर्व्ह बॅंकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व करंट अकाउंट, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेची खाती बँक नियमितपणे देखरेख ठेवतील. ही देखरेख किमान तिमाही आधारावर होईल.
चला करंट अकाउंटबद्दल अधिक तपशील जाणून घेऊयात….
करंट अकाउंट हे व्यवसाय करणार्या लोकांसाठीचे बँक खाते आहे. हे आपल्याला दररोजच्या व्यवसायाच्या व्यवहार करण्यास अनुमती देते.
करंट अकाउंट मध्ये असणारी रक्कम बँक शाखा किंवा एटीएममधून कधीही काढता येऊ शकते. यासाठी कोणतेही बंधन नसते. खातेदार कितीही वेळा पैसे काढू तसेच भरू शकतात. म्हणजेच करंट अकाउंट मध्ये आपण एका दिवसात पाहिजे तितके व्यवहार करू शकतो.
व्यवसायाच्या गरजेनुसार करंट अकाउंट मध्ये जमा केलेली रक्कम बर्याचदा फ्लक्चुएट (वर आणि खाली) होत असते. त्यामुळे बँका हा पैसा वापरत नाहीत. असे म्हटले जाऊ शकते की बँकांकडून ही एक प्रकारची खास सुविधा आहे.
बचत बँक खात्यात जिथे तुम्हाला खात्यातील शिल्लक रकमेवर व्याज मिळते. त्याच वेळी, करंट अकाउंट मध्येच्या शिल्लकवर कोणतेही व्याज नसते. करंट अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही मतदार ओळखपत्र, फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट वापरू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.