कोरोनासोबत जगताना, जगातील कोरोना मृतांची संख्या ५ लाखांच्या वर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या महामारीचे संपूर्ण जगावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी च्या आकडेवारीनुसार संपूर्ण जगात या विषाणूने ५,०२,५१७ लोकांचा बळी घेतला आहे. आणि एकूण रुग्णसंख्यादेखील वाढली असून ती १०,१७३,७२२ इतकी झाली आहे. संपूर्ण जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी ४० हजारपेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत आढळून आले होते. 

अमेरिकेनंतर जगातील सर्वाधिक रुग्ण ब्राझील मध्ये आढळून आले आहेत. ब्राझील मध्ये एकूण १३,४४,१४३ रुग्ण आढळले आहेत तर आतापर्यंत ब्राझीलमधील ५७,६२२ इतके रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तर अमेरिकेत आतापर्यंत १,२५,८०३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. रुस मध्ये संक्रमणाच्या एकूण ६,४०,२४६ केसेस सापडल्या आहेत. आतापर्यंत इथे ९,१५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्येत भारताचा नंबर लागतो. भारतात ५,४८,३१८ इतकी रुग्णसंख्या असून एकूण १६,४७५ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

ब्रिटन मध्ये ३,१२,६२५ प्रकरणे समोर आली असून ४३,६३४ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. ब्रिटन नंतर स्पेन मध्ये रुग्णसंख्या २,४८,७७० असून मृतसंख्या २८,३४३ आहे. तर इटली मध्ये रुग्णसंख्या २,४०,३१० असून मृतसंख्या ३४,४५९ आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येत भारत चौथ्या क्रमांकावर असला तरी भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे. तसेच सर्वाधिक मृतांच्या आकडेवारीरत भारत अमेरिका, ब्राझील, इटली, स्पेन यांच्याही मागे आहे. हे चित्र समाधानकारक आहे

Leave a Comment