यंदाची आंबेडकर जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

0
51
संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. दरम्यान, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केलं. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचं, मानवतावादी शिकवणींचं पालन करून देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून बाबासाहेबांची जयंती साजरी करुया, त्यांना अभिवादन करुया. घरी राहून जयंती साजरी करताना बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व करोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असं अजित पवार म्हणाले. करोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असंही अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here