देवेंद्र फडणवीसांचा अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब ; ‘हा’ केला गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन । माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेच्या अधिवेशनात ‘पेनड्राईव्ह बॉम्ब’ टाकला. त्यांनी चक्क संभाषणाचे व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपचे सभागृह अध्यक्षांपुढे सादर केली. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यावर यावेळी गंभीर आरोप केला. “राज्य सरकारकडून सरकारी वकिलांच्या माध्यमातून विरोधकांवर खोट्या केस लावून त्यांना संपवण्याचा कट रचला जात असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला.

काल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाचे कामकाज चालत असताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात व्हिडिओ क्लिप सादर केली. तसेच राज्य सरकारकडून विरोधकांना संपवण्याचे एक प्रकारे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. विशेष सरकारी वकील प्रविण पंडित चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे यावेळी दिले. अजित पवार, छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अनिल गोटे, एकनाथ खडसे, जयकुमार रावल, हेमंत नगराळे आदींबाबत विशेष सरकारी वकिलांच्या व्हिडीओमधील संवाद फडणवीस यांनी यावेळी वाचून दाखवला.

यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवरही गंभीर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, माजी मंत्री आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्याबाबत राज्य सरकारकडून षडयंत्र रचले गेले आहे. गिरीश महाजनांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला. 2021 मध्ये असा गुन्हा दाखल केला की 2018 मध्ये मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या एका वादाबाबत भोईटे गटाच्या वतीने महाजनांची स्वीय सहायक रामेश्वर यांनी पाटील गटाच्या एकाचे अपहरण केले. अशा प्रकारची अत्यंत बनावट केस तयार केली. त्या पलिकडे जाऊन गिरीश महाजनांचा मोक्का लागला पाहिजे म्हणून तशी कागदपत्र गोळा केली गेली.

 

Leave a Comment