हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोवा विधानसभा निवडणुकीमुले सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. अशात आज भाजप नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत पत्रकार परिषद घेत मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेसने गोव्याची प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. काँगेसमधील लोकांना केवळ सत्ता हवी आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. आता जनतेचाही विश्वास काँग्रेसवर राहिलेला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यातील राजकीय परिस्थितीबाबत सांगायचे झाले तर या ठिकाणी इतर पक्ष केवळ भाजपशी संघर्ष करत आहेत. भाजपसोबत संघर्ष करणाऱ्या पक्षांचा इतिहास इतरांनी पहावा. काँग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केले.
LIVE | Addressing media at BJP Headquarters, New Delhi. https://t.co/ZpXgFJmy9L
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 20, 2022
काँग्रेसकडे 2007 ते 2012 च्या काळात जेव्हा सत्ता होती. त्यावेळी या पक्षाने मोठं मोठे घोटाळे केले. आणि आपली गोव्यात असणारी आणि गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेते सोडून गेले आहेत. गोव्याने टीएमसीची आक्रमकता नाकारली आहे. टीएमसी सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवशावर त्यांनी राजकारण सुरू केले आहे. गोवा एक मार्केट आहे आणि नेते मार्केटचे नेते विक्रीसाठी आहे, अशा प्रकारची वृत्ती टीएमसीने आहे, असे फडणवीस यांनी म्हंटले.