हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार तथा नेते संजय राऊत यांच्यावर काल ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांनी आज पुन्हा भाजप आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला. राऊतांच्या आरोपानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना प्रतित्युत्तर दिले असून ईडीला ज्या काही पुरावे मिळालेले आहेत. त्या पुराव्याच्या आधारे ईडीने नोटिसा दिल्या आहेत. त्याला कायद्याने उत्तर देणे अपेक्षित आहे. मात्र, काही जणांकडून नख कापून शहीद होण्याचा प्रयत्न केला जात आहे. भवनात्मक होऊन उत्तर दिले जात आहे लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही, असे फडणवीस यांनी म्हंटले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राऊतांच्या कारवाईबाबत प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांच्यावर ईडीने जी कारवाई केली आहे. त्या कारवाईला राऊतांनी उत्तर द्यावे. ईडीला काही पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळेच तर ईडीने नोटीस दिल्या. आता राऊतांनीही याबाबात स्पष्टीकरण द्यावे, असे फडणवीस यांनी म्हंटले.
संजय राऊत यांचा आरोप काय?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजपा नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले. “किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी कोट्यावधी रुपये जमा केले. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहचलाच नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. मग हा निधी गेला कुठे असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणात 57 कोटी रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.