“अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो”; फडणवीसांकडून पत्र ट्विट करत राहुल गांधींना टोला

Devendra Fadnavis Rahul Gandhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे पत्र ट्विट केले आहे. “देश तुम्हाला नेहमीच विचारत आला आहेत की, जर तुम्ही सावरकर यांच्या बद्दल काही विशिष्ट वाचल तर देशातील कित्येक पिड्या हा प्रश्न विचारत राहिलतील, “अरे भाई आख़िर कहना क्या चाहते हो”, असे लिहीत फडणवीसांनी गांधींना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना सावरकरांबद्दल काही बढया नेत्यांनी केलेल्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकर यांच्या बद्दल केलेले भाषन देखील ट्विट केले आहे.

“महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान असलेले शरद पवार वीर सावरकरांबद्दल काय म्हणतात ते फक्त वाचा आणि ऐका. या पत्रात त्यांनी दोन जन्मठेपेचा उल्लेख केला आहे”, असा भाषणाचा व्हिडीओ फडणवीसांनी ट्विट केला आहे.

त्याचप्रमाणे पुढे सावरकर यांच्या बद्दल काँग्रेसचे माजी नेते, देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी केलेल्या विधानाचाही उल्लेख केला आहे. ते म्हणतात की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्रवादी होते. त्यांची सामाजिक सुधारणेची बांधिलकी, आजच्या तरुण पिढीला ते शिकवण्याची ऊर्जा होती. याचे एक पत्र देखील फडणवीसांनी ट्विट केले आहे.