ब्रेकिंग : डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नीने केला उमेदवारी अर्ज दाखल

1
88
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । प्रतिनिधी

अहमदनगर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आज त्यांच्या धनश्री सुजय विखे यांनी अचानकपणे घेऊन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याची वेळसंपण्यास दहा मिनिटे बाकी असताना जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन स्वतःचा अर्ज भरलेला आहे.

धनश्री विखे यांना भारतीय जनता पक्षाने एबी फॉर्म दिल्याने नगरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. तसेच भारतीय जनता पार्टी कडून नक्की कोण उमेदवार आहे असा असा प्रश्न पडला आहे

सुजय विखे पाटील यांच्या बाबतीत काँग्रेस आघाडीने दाखवलेली हीन वागणूक पाहता सुजय विखे पाटील यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची दिल्ली वरून उमेदवारी देखील जाहीर झाली. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आता मात्र त्यांच्या पत्नीने आपला स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नगरच्या राजकारणात नव्याने सस्पेन्स तयार झाला आहे. त्यामुळे आता अहमदनगर मधून सुजय विखे पाटील माघार घेणार कि त्यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील माघार घेणार हे पाहण्यासारखे राहणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

नगर दक्षिण मतदारसंघासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी आणि दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या..

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

नगरचे नगरसेवक म्हणतात “कोणता झेंडा घेऊ हाती?”

राधाकृष्ण विखेंची भाजप खासदार दिलीप गांधींसोबत खोलीबंद चर्चा

या कारणामुळे मी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलो, नरेंन्द्र पाटील यांचा गौप्यस्फोट

मोहिते-पाटलांचा पत्ता कट… भाजपकडून माढा मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here