हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे नेते गजानन काळे व संदीप देशपांडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजप खासदार बृजभूषण सिंह व खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो करत गंभीर आरोप केले. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनसेचे आरोप हे बिनबुडाचे आहेत. फोटो आणि रसद पुरवण्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री पाटील यांनी दिली.
मनसेच्या ट्विटनंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार साहेब हे अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे प्रमुख आहेत. आणि बृजभूषणसिह देखील त्याच्या राज्यातील कुस्ती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यामुळे जुन्या काळात महाराष्ट्रात जेव्हा एक कुस्तीचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमातीळ तो फोटो दिसत आहे. त्यामुळे या फोटोचा आणि आजच्या राजकीय घडामोडीचा काहीही संबंध लावायचा काहीही कारण नाही, असे मला काहीही वाटत नाही, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे.
"ब्रिज" चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे …
( फोटो झूम करून पाहावा…) pic.twitter.com/oYQZnMbM7Y
— Gajanan Kale (@MeGajananKale) May 24, 2022
संदीप देशपांडे यांनी काय केली आहे टीका ?
दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही आज एक फोटो ट्विट केर शरद पवार त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहार कि, “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.