लग्नाला नकार दिला म्हणून दिग्दर्शकाची हत्या

Director babak
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांची लग्न करायला नकार दिला म्हणून हत्या करण्यात आली आहे. हि हत्या त्यांच्या आईवडिलानीच केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बबाक खोराम्मदीन हे गेली अनेक वर्षे इंग्लंड येथे राहत आहे. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्यासाठी ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते.त्यावेळी त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे लग्नावरून वाद झाले. त्यांनी लग्न करावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती पण बबाक लग्नाला नकार देत होता यामुळे सामाजिक प्रतिष्ठेकरिता त्यांच्या आईवडिलांनीच त्यांची हत्या केली आहे.

त्याची हत्या करण्यापूर्वी त्यांच्या आई-वडिलांनी त्याला कॉफीमधून गुंगीचं औषध दिले. यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे केले व ते कचऱ्याच्या पिशवीत टाकले. यानंतर हि पिशवी पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. जेव्हा बबाक यांच्या आई-वडिलांची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. बबाक अविवाहित होते. त्याला आम्ही वारंवार लग्न करण्याबाबत विचारायचो पण तो आमचे म्हणणे ऐकायला तयार नव्हता. यामुळे आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. या सगळ्याचा परिणाम आमच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही होत होता. यामुळे आम्ही आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये यासाठी त्याची हत्या केली आहे.

आम्ही केलेल्या कृत्याचा आम्हाला अजिबात पश्चाताप होत नाही, असा दावा बबाक यांच्या वडिलांनी न्यायालयाकडे केला आहे. अशी माहिती तेहरान क्रिमिनल न्यायालयाचे प्रमुख मोहम्मद शहरयार यांनी दिली आहे. पोलिसांनी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या आईवडिलांना अटक केली आहे. बबाक यांनी 2009 मध्ये फॅकल्टी ऑफ फाईऩ आर्टस् ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ तेहरान इथून मास्टर्स डिग्री घेतली होती. यानंतर त्यांनी काही शॉर्ट फिल्म्सदेखील बनवल्या होत्या. बबाक खोराम्मदीन यांच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.