देशात १७० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जे यश आले आहे ते काम पुढेही असेच सुरु ठेवायचे आहे. यानुसार देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसऱ्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही करोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, असे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार देशात जवळपास १७० जिल्हे हॉटस्पॉट तर २०७ जिल्हे हॉटस्पॉट नसलेले जिल्हे आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्याची घोषणा केली. यासोबतच २० एप्रिलपर्यंत देशातील प्रत्येक शहराची आणि जिल्ह्याची तपासणी केली जाईल. कुठल्या भागात आणि जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत आणि तिथे कशा प्रकारे रुग्णांवर उपचार सुरू आहेत हे बघितले जाईल. हे तपासण्यासाठी केंद्राकडून काही दिशानिर्देश जारी केले जातील, असं पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना दिशानिर्देश जारी केले आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान

लॉकडाउन संदर्भात केंद्राची नवी नियमावली, जाणून घ्या काय सुरु राहणार अन काय बंद

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

लाॅकडाउन वाढल्याने ६ महिने वाढू शकते EMI मधील सूट, घ्या जाणुन

आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

https://youtu.be/jnWhu6C5Q7o

 

Leave a Comment