हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन करताना काँग्रेससह विरोधकांवर विविध मुद्यावरून टीका केली. यावेळी मोदींनी राहुल गांधींना अप्रत्यक्षरीत्या टोमणा मारत त्यांना लक्ष केलं. मोदींनी लोकसभेतील केलेल्या भाषणावर राहुल गांधी यांनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली.
”मूळ मुद्यांपासून देशाचे लक्ष भरकटवणे ही पंतप्रधान मोदींची शैली आहे. ते काँग्रेस, जवाहरलाल नेहरू व पाकिस्तान आदींबद्दल बोलतील परंतू मूळ मुद्याबाबत बोलणार नाहीत.आज बेरोजगारी आणि रोजगार हे सर्वात मोठे मुद्दे आहेत. आम्ही अनेकदा याबाबत पंतप्रधान मोदींकडे विचारणा केली. मात्र, ते याबद्दल एक शब्द देखील बोलले नाहीत. अशातच अर्थमंत्र्यांनी देखील लांबलचक भाषण केलं, परंतु त्यांनी देखील बेरोजगारी बद्दल एक शब्द काढला नाही.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
दरम्यान, आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवदेन केलं. आपल्या निवेदनात मोदी म्हणाले, ”काँग्रेसच्या वाटेनं आम्ही गेलो असतो, तर देश बदलला नसता. ३७० कलम, तिहेरी तलाक रद्द झालं नसतं. राम जन्मभूमीचा वाद आजही सुरूच असता,” असं सांगत मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देखील अप्रत्यक्षरित्या टिप्पणी केली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.