घबराना मत, चुनौती का सामना मिलकर करेंगे; उद्धव ठाकरेंचा परप्रांतीयांना दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र | देशातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहेत. त्या मजुरांना १४ तारखेला लॉकडाऊन हटेल असं वाटलं होतं म्हणून ते एकत्र आले होते. पण संचारबंदी वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. पण राज्याचा प्रमुख म्हणून मी त्यांना आश्वासित करु इच्छितो की तुमची संपूर्ण काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजिबात घाबरु नका. लॉकडाऊन झाल्यानंतर तुम्हाला लगेच घरी पोहचविण्याची जबाबदारी माझी या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी परप्रांतीयांना दिलासा दिला.

चांगलं काम करत असताना राजकारण मधात आणण्याचा प्रयत्न करु नये असं मी वारंवार बजावून सांगत आहे. पण ते जर ऐकलं जात नसेल तर आपणच आपले मोठे शत्रू आहोत असं सांगत उद्धव ठाकरेंनी कोरोना प्रकरणावरून राजकारण करणाऱ्यांना चपराक लगावली. कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला आरोग्यसेवक योध्यांची गरज असून २१ हजार लोकांनी यासाठी तयारी दाखवल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी जनतेचे आभार मानले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment