आता येणार चीप असणारे ई पासपोर्ट; अगोदरपेक्षा जास्त सुरक्षित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पासपोर्ट (Indian Passport) अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार (Government of India) आता मोठी पावले उचलणार आहे. सरकार भारतीय सुरक्षा प्रेस आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर फॉर चिप एनेबल ई पासपोर्टवर काम करत आहे. यामुळे ट्रॅव्हल डॉक्युमेंटसची सुरक्षा वाढेल. पासपोर्टबाबत अनेक प्रकारच्या फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत. बर्‍याच वेळा गुन्हेगार आणि फसवणूक करणारे लोक बनावट पासपोर्ट बनवून परदेशात पळून जातात. मात्र आता असे होणार नाही.

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की, आम्ही भारतीय सुरक्षा प्रेस, नाशिक आणि राष्ट्रीय माहिती केंद्राच्या सहकार्याने चिप एनेबल ई-पासपोर्टवर काम करत आहोत. या ई-पासपोर्टच्या आगमनामुळे आमच्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटसची सुरक्षा मजबूत होईल. ई-पासपोर्टच्या प्रॉडक्शनच्या प्रोक्योरमेंटची प्रक्रिया सुरू आहे.

>> ते म्हणाले की, पासपोर्ट सेवा केंद्रे नसलेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरकारला पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करायचे आहेत. आतापर्यंत 488 लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट सेवा केंद्रे उघडण्यात आली आहेत.

>> ते म्हणाले, आम्ही ही प्रक्रिया वेगाने पुढे करत होतो पण कोविड -१९ संसर्गामुळे ही प्रक्रिया सध्या थांबली आहे.

>> पासपोर्ट सेवा दिनानिमित्त परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि परदेशात पासपोर्ट कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की कोरोना संकटाच्या वेळीही हे सर्व लोक पूर्ण जबाबदारीने आपले काम करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.