SBI मध्ये अकाऊंट उघडणे सोपे; कोणत्याही कागदविना काही मिनिटांत काम होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपले खाते उघडण्यासाठी पूर्णपणे नवीन आणि अ‍ॅडव्हान्स पद्धत वापरत आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आता या सरकारी बँकेत खाते उघडण्यासाठी कोणतेही पेपरवर्क करण्याची गरज नाही. आणि अगदी ५ मिनिटातच आपले खातेही उघडले जाईल.

एसबीआय देणार इन्स्टंट बँक खाते देईल
एसबीआयने इंस्टा सेव्हिंग बँक अकाउंटची सुविधा सुरू केली आहे. हे आधार बेस्ड इन्स्टंट डिजिटल सेव्हिंग अकाउंट आहे ज्याद्वारे ग्राहक बँकेच्या इंटिग्रेटेड बँकिंग आणि लाइफस्टाइल प्लॅटफॉर्म YONOद्वारे आपले खाते उघडू शकतात. एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे ग्राहकांना याविषयी सूचित केले आहे,’ इंस्टा बचत खाते हे घरात बसूनच अगदी सहजपणे उघडता येते. या बचत खात्याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे येथे मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही तसेच यावर कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

 

बचत खाते कसे उघडावे
एसबीआय तुम्हाला त्वरित हे बचत खाते उघडण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग सांगते. यासाठी आपण Google Play Store वरून YONO अ‍ॅप डाउनलोड करा. मग त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा. यानंतर, बँक आपल्या मोबाइलवर एक वेरिफिकेशन कोड पाठवेल. तो सबमिट करा आणि आपले बचत खाते उघडले जाईल. यामध्ये ग्राहकाला त्याची डिटेल्स बँकेत जमा करण्यासाठी पूर्ण एक वर्षाची मुदत दिली जाते. त्यामुळे आपण कधीही आपल्या जवळच्या शाखेत जाऊ शकता आणि सर्व आवश्यक ती कागदपत्रे देऊ शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.