मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाचा (HSC) निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार

मुंबई | दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या १६ जुलै रोजी लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. उद्या दुपारी १ वाजता महाराष्ट्र बाॅर्डाचा … Read more

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की, IAS आणि IPS अधिकारी ही दोन्ही जिल्ह्यातील महत्वाची पदे आहेत. IAS आणि IPS हे एकमेकांना पूरक असतात. ही दोन्ही पदे भारतीय समाजाच्या विकासासाठी आवश्यकच आहेत. IAS आणि IPS या अग्रगण्य अखिल भारतीय सेवा आहेत ज्यामध्ये आयएएस ही उमेदवारांची पहिली पसंत असते. एका जिल्ह्यात एकापेक्षा जास्त IAS … Read more

.. म्हणून IAS अधिकाऱ्यानं बारावीत काठावर उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका केली ट्विट

नवी दिल्ली । परीक्षेत मिळणारे गुण हेच सर्वस्व नसतं. किंबहुना त्यांच्या आधारे अमुक एका विद्यार्थ्याचं भवितव्यही ठरत नाही, हेच सध्या एका IAS अधिकाऱ्याची गुणपत्रिका सिद्ध करत आहे. IAS अधिकारी नितीन संगवान यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या बारावी इयत्तेती गुणपत्रिका सर्वांच्या भेटीला आणली आहे. सध्या ही गुणपत्रिका आणि त्यासोबत नितीन संगवान यांनी दिलेला संदेश सध्या … Read more

राज्य सरकारने शाळांना निधी देवून शाळा सुरू कराव्यात – अशोकराव थोरात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून राज्यातील शाळा सुरू कराव्यात. कोरोनाच्या महामारीत सर्वात जास्त बाधित क्षेत्र हे शिक्षण क्षेत्र आहे. तेव्हा शाळेत सॅनिटियझेशन करणे, डिस्टन्सिंग पाळणे, मनुष्यबळ नेमने, दोन सत्रात शाळा भरवण्याची गरज आहे. परंतु त्यासाठी सरकारने शैक्षणिक वर्ष व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व शाळांना निधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे … Read more

वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार- अशोक चव्हाण

मुंबई । मराठा आरक्षणावर आज (15 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली. “पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला असून, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. पदव्युत्तर वैद्यकीय … Read more

CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ९८.५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सेन्ट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशन (CBSE)चा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी 91.46% टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये 93.31% मुली तर 90.14% मुलांचा समावेश आहे. त्रिवेंद्रम, चेन्नई आणि बंगळुरू या 3 शहरातील विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे.महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, अशाप्रकारे अर्ज करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची … Read more

बारावीत अपयश आलं तर खचून जाऊ नका; ‘या’ IAS अधिकार्‍यांचे गुणपत्रक पाहिलंत तर म्हणाल…

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र ।आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वेळा परीक्षेतील गुणांना महत्व दिले जाते. गुणांवर मुलांचे भवितव्य आहे असे वारंवार सांगितलं जातं. त्यासाठी आई वडील आणि नातेवाईक मुलांच्या मागे अभ्यास करण्यासाठी तगादा लावतात. त्यामुळे अनेक वेळा मुलं ताण तणावाखाली जाऊन चुकीचे पाऊल टाकतात. दहावी आणि बारावी त्यात बोर्डचा निकाल म्हंटल की मुलांना गुणांची आणि भविष्याची चिंता … Read more

ऑनलाइन शिक्षणानं केला घात; मोबाइल घेऊन न दिल्यानं विद्यार्थ्यांची आत्महत्या

सांगली प्रतिनिधी । ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांकडून मोबाईल मिळत नसल्याने दहावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार जत तालुक्यातील मल्लाळ येथे सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा घडला. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय १५, रा. मल्लाळ, ता. जत) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत मंगळवारी (ता. १४) जत पोलिस ठाण्यात वडील आप्पासाहेब मारुती हराळे यांनी … Read more

कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड १९’ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई करा!- कृषी मंत्री दादा भुसे

मुंबई । कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर प्रमोटेड कोविड-१९ असा शिक्का असल्याच्या बातमीने मंगळवारी चांगलीच खळबळ उडाली. या घटनेची दखल घेत कृषी मंत्री दादा भुसे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत. … Read more