‘भरारी घे जरा…न्यू ईयर@2020’

लाईफस्टाईल । एका कवीने खूप छान लिहून ठेवले आहे, “तू आहेस कोण हे समजू दे जरा, हृदयाने दिलेली हाक, तुझ्या मनापर्यंत पोहोचू दे जरा, उंच आभाळी भरारी घे जरा….” दर वर्षाप्रमाणे आता हे वर्ष ही ३१ डिसेंबरच्या पार्टीने मागे पडले आणि आलेले नविन वर्ष काही नविन संकल्प करण्याचे स्वप्न घेऊन आले. ही सर्व स्वप्न पहात … Read more

नव्या लढ्यासाठी मी सज्ज, आता एक इंचभरही मागे हटणार नाही – आयशे घोष

तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद..!! आता मी सुरक्षित असून परत आले आहे. नवीन लढ्यासाठी पुन्हा सज्ज होऊन..!! या लढ्यात आता एक इंचभरही मागे हटणार असं मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेची प्रमुख आयशे घोष हिने व्यक्त केलं आहे.

छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धा

छत्रपती शिवाजी कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ संलग्न मराठी शिक्षकांच्या संघटनेतर्फे राष्ट्रीय काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धेचं आयोजन १० जानेवारी रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये करण्यात आलं आहे.

सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर फुटपाथवर झोपण्याची वेळ

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे परभणी येथे शुक्रवारी सैन्यभरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय झाल्याने त्यांना फुटपाथवर झोपण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे. योग्य नियोजन न झाल्याने हजारोंच्या संख्येने इथे आलेल्या उमेदवारांची चांगलीच अडचण झाली आहे. पहील्याच दिवशी परिक्षार्थींना भर थंडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याने हजारो उमेदवारांची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा … Read more

ओव्या गात, गाणी म्हणत चिमुकल्यांकडून सावित्रीबाईंना अभिवादन

सावित्रीबाई फुले यांची जयंती मुर्शीतपुर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लहान मुलींनी सावित्रीबाईंची वेशभूषा साकारली होती.

 महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

स्त्री शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महिलांसाठी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली.

कल्पनेचे उद्योगधंद्यामध्ये रूपांतर करणे आवश्यक – डॉ. जेरे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व उपक्रम केंद्राद्वारे आयोजित क्लस्टर लेव्हल ‘इनोव्हेशन 2 एंटरप्राईज’ (आय २ ई) स्पर्धेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या मानव विकास मंत्रालयाचे चीफ इनोव्हेशन ऑफीसर डॉ. अभय जेरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.

मोदी-शहांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी जखमी झालेत, पोलिसांची हाणामारी संपेना, आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होतेय…तरीसुद्धा..

या आंदोलनाची तीव्रता उत्तर प्रदेशमधील अलिगढ युनिव्हर्सिटी, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी वाढली असून या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

यशवंतराव चव्हाण आणि खाशाबा जाधवांच्या शाळेला १०० वर्ष पूर्ण

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि पहिले ऑलम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले. त्या कराड शिक्षण मंडळाचे २०२०-२०२१ हे शताब्दी वर्ष साजरे केले जाणार असल्याची माहिती कराड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी यांनी दिली.