लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा भीषण अपघात

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर : हॅलो महाराष्ट्र – राज्यात अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अपघाताची (accident) घटना लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. कार आणि आयशर टेम्पोमध्ये हा भीषण अपघात (accident) झाला आहे.

दोन्ही वाहनांची समोरासमोर झाली धडक
हाती आलेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पो हा भरधाव वेगात आला होता. आयशर भरगाव वेगात असल्याने चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. त्यामुळे त्याने थेट कारला जोराची धडक दिली. आयशर आणि कार या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण हे गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात (accident) कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

जखमींना उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले
जखमींना उपचारासाठी लातूर येथील स्वर्गीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती सध्या गंभीर आहे. या अपघातात (accident) उदगीरमधील समता नगरमधील रहिवासी तानाजी कुमदाळे आणि अन्य एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती