जळगाव : हॅलो महाराष्ट्र – एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार आणि अपक्षांनी केलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायाला मिळाली. या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले. या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले. यातच ठाकरे गट आणि विरोधकांनी 50 खोक्यांच्या मुद्द्यावरुन शिंदे गटावर वारंवार निशाणा साधण्यास सुरुवात केली. यादरम्यान आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकू, असा इशारा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
खोक्यांचा व्यवहार हा आतला व्यवहार असतो. त्यामुळे खोके घेतले की नाही घेतले याला पुरावा असू शकत नाही. खोके आणि पेट्यांचा व्यवहार झाला, हे शिंदे गटाच्या आमदारांनीच सांगितलं होतं. गुवाहाटीपासून खोक्यांची सुरुवात झाली आणि शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी गेले होते तेव्हा त्यांनीच खोक्यांचा विषय काढत सूचक वक्तव्य केलं होतं असा आरोप यावेळी एकनाथ खडसेंकडून (eknath khadse) करण्यात आला आहे.
या आमदारांमुळेच खोक्यांचा विषय हा जनतेपर्यंत पोहोचला. त्यामुळे खोके घेतले किंवा नाही घेतले हे पुराव्यानिशी देणं हे अत्यंत अवघड आहे. मग मानहानीचा दावा कशासाठी? असा प्रश्नदेखील राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच खोके घेतले म्हणजे तुम्ही पैसे घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही असेदेखील ते म्हणाले. त्यामुळे मानहानीची नोटीस दिल्यास सत्य जनतेच्या समोर येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्याकडून देण्यात आली आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती