हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केला आहे. आयोगाच्यावतीने नुकतेच एक परिपत्रक जारी करण्यात आले असून 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत असल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार दि. 5 जुलै पासूनच आचारसंहिता लागू होणार आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान, तर 5ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. यामुळे पुढील महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
निवडणूक आयोगाच्यावतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3) मधील कलम 10 अ पोटकलम (4) मधील अधिकारांचा वापर करत 271 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनाची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात यावी, असेही निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5. 30 वाजेपर्यंत मतदान होईल. या निवडणुकी दरम्यान कोरोना नियमांचे पालन करण्यात यावे, असेही पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यात उडणार ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा
1)नाशिक – 40,
2) धुळे – 52,
3) जळगाव – 24,
4)अहमदनगर – 15,
5) पुणे – 19,
6) सोलापूर – 25,
7) सातारा – 10,
8) सांगली – 1,
9)औरंगाबाद 16,
10) जालना – 28,
11) बीड – 13,
12) लातूर – 9,
13) उस्मनाबाद – 11,
14) परभणी – 3,
15) बुलढाणा – 5
कसा आहे निवडणूक कार्यक्रम –
- 5 जुलै (मंगळवार ) : निवडणूक नोटीस प्रसिद्ध
- 12 जुलै ते 19 जुलै : सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर
- 20 जुलै : नामनिर्देशनपत्र छाननी
- 22 जुलै : नामनिर्देशनपत्र मागे घेणे अंतिम दिवस
- 22 जुलै (दुपारी तीन नंतर) : निवडणूक चिन्ह व उमेदवारांची यादी प्रसिद्ध
- 4 ऑगस्ट : आवश्यक असल्यास मतदान
- 5 ऑगस्ट : मतमोजणी व निकाल