नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 85 हजार कोटी रुपये टॅक्स भरणार असल्याचे सांगितले आहे. असे झाले तर, अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कोणी टॅक्सच्या रूपात एवढी मोठी रक्कम भरेल.
मस्क आणि वॉरन यांच्यात शाब्दिक सुरू
अमेरिकेतील प्रतिष्ठित टाईम मासिकाने गेल्या आठवड्यात मस्क यांना यावर्षीचा ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे. यूएस सिनेटर एलिझाबेथ वॉरन यांच्यासाठी त्यांची कामगिरी चांगली झाली नाही. त्यांनी ट्विटरवर एलन मस्क यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप केला. त्यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ऐवजी ‘टॅक्स रिगर’ म्हंटले पाहिजे, असे वॉरन म्हणाले. यानंतर वॉरन आणि मस्क यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले.
अमेरिकेच्या महसूल सेवेला सर्वाधिक टॅक्स मिळेल
त्यानंतर मस्क म्हणाले की,” या वर्षी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक टॅक्स देणारे ठरणार आहे. त्यांनी ट्विटरवर वॉरनला उत्तर देताना लिहिले- “जर तुम्ही 2 सेकंद डोळे उघडले तर तुम्हाला समजेल की, मी या वर्षी इतिहासातील कोणत्याही अमेरिकनपेक्षा जास्त टॅक्स भरणार आहे.” मस्कने 85 हजार कोटींहून जास्तीचा टॅक्स भरला तर तो अमेरिकन महसूल सेवेला मिळणारा सर्वाधिक टॅक्स पेमेंट ठरेल.
एलन मस्क किती टॅक्स भरणार?
हिशोब करायचा झाला तर 85 हजार कोटी रुपये हा त्यांच्या कमाईचा एक छोटासा भाग आहे. एलन मस्क सध्या नेटवर्थच्या बाबतीत जगात आघाडीवर आहेत. 255 अब्ज डॉलर्ससह ते पहिल्या क्रमांकावर आहे. यावर्षी हे आकडे 55 अब्जांनी वाढले आहेत.