हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । EPFO : सरकारी आणि निमसरकारी संघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना लवकरच आंनदाची बातमी मिळणार आहे. कारण सरकार कडून कर्मचार्यांना 2022 या आर्थिक वर्षाचे व्याज लवकरच ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात 30 जूनपर्यंतच्या व्याजाचे पैसे ट्रान्सफर करू शकते. हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून PF वर 8.1% व्याज दिले जाते. मात्र, ईपीएफओ ने खात्यांमधील व्याज ट्रान्सफर करण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.
2021-2022 या आर्थिक वर्षासाठी EPFO कडून 8.1% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. हे जाणून घ्या कि, गेल्या 10 वर्षांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. यावेळी सरकार व्याज दरात वाढ जाहीर करेल, अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात तसे काहीही झालेले नाही. गेल्या आर्थिक वर्षात PF वर 8.5% व्याज दिले गेले होते.
दिवसेंदिवस व्याज सतत कमी होते आहे
2019-2020 या आर्थिक वर्षात EPFO कडून 8.5% व्याज देण्यात आले होते. त्याचबरोबर 2020-2021 मध्ये देखील 8.5% दराने व्याज मिळाले होते. 2018-19 मध्ये 8.65%, 2017-18 मध्ये 8.55%, 2016-17 मध्ये 8.65% आणि आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8.8% देण्यात आले होते.
अशा प्रकारे ऑनलाइन बॅलन्स तपासा
आता PF खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही. आपल्याला EPFO च्या अधिकृत वेबसाइट http://epfindia.gov.in वर जाऊन बॅलन्स तपासता येईल. यावर जाऊन ई-पासबुकवर क्लिक करा. ज्यानंतर UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. यानंतर आपल्या PF खात्याशी संबंधित माहिती दिसू लागेल. मेंबर आयडी दिसेल. ते निवडल्यास ई-पासबुकवर PF बॅलन्स दिसू लागेल.
हे पण वाचा :
Bank FD : आता ‘या’ विदेशी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याज दरात केली वाढ !!!
Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!
Gold investment : अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!
Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले