औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झालेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत खैरे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला औरंगाबादमध्ये ऊत आला आहे. वैजापूरचे माजी आमदार आर.एम वाणी यांनी प्रकृतीचे कारण देत विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या ठिकाणी जागा झाल्याने खैरेंना त्या जागी पुनर्वसित केले जाईल असे बोलले जाते आहे.
वैजापूर मतदारसंघातून कोणी उभा राहायचे याचा पूर्ण निर्णय आर.एम वाणी यांच्या हातात आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या शब्दाच्या पुढे कुणीही जाणार नाही. तसेच वाणी ज्या नावाला होकार देतील तेच नाव निश्चित केले जाईल आणि उद्धव ठाकरे देखील त्याच व्यक्तीला उमेदवारी देतील असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तीन वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या आर.एम वाणी यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी पराभव केला. त्यानंतर आता आर.एम वाणीयांनीच उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील काही दिवसापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत वैजापूर तालुक्याचे शिवसेना तालुका अध्यक्ष रमेश बोरनारे यांचे नाव वाणी यांनी पक्ष श्रेष्ठींना सुचवले आहे. त्यामुळे खैरे कि बोरनारे हा पक्षापुढे पेच आहे. तर रमेश बोरनारे हे देखील जुने शिवसैनिक आहेत. ते सुद्धा चांगले उमेदवार होऊ शकतात असे मत स्वतः चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वैजापूर मध्ये उमेदवार कोण हा प्रश्न मातोश्रीला पेचात टाकणारा ठरणार आहे.
हे पण वाचा –
मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणाऱ्या विनोद पाटलांना हा पक्ष बनवणार आमदार
लक्ष्मण मानेंनी केली नव्या राजकीय पक्षाची घोषणा ; काँग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत
लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार्या माॅडेलचा प्रियकरानेच केला होता खून
आणि रोहित पवारांनी त्याच्या हट्टापायी सलूनमध्ये केली कटींग!
म्हणून सनी लिओनी कधीच पाहत नाही आपल्या आई-वडिलांचा फोटो
ना मंत्रीपद, ना राज्यपाल पद , विजयसिंहांना मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी?
अजित पवार मोहिते पाटलांच्या पाठीशी ; घेतली मुख्यमंत्र्यांची भेट