हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या सुरक्षिततेसाठी पंतप्रधान वय वंदना योजना किंवा पीएमव्हीव्हीवायची मुदत ही पुढील ३ वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. ही योजना आता ३१ मार्च २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट समितीने नुकताच हा निर्णय घेतला आहे. पीएमव्हीव्हीवाय ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी त्यांना किमान पेंशनची हमी देते. पीएमव्हीव्हीवाय योजनेंतर्गत किमान पेंशन (वर्षासाठी) १००० रुपये दरमहा मिळण्यासाठी १,६२,१६२ रुपयांपर्यंतची किमान गुंतवणूक सुधारित केली गेली आहे.
पीएमव्हीव्हीवायची सुरूवात २०१७ मध्ये झाली होती
ही योजना २०१७ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत एलआयसीचा लाभ ऑनलाइन किंवा ऑफलाइन गुंतवणूकीद्वारे घेता येईल. ही योजना केवळ ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठीच आहे.
यासाठीच कालावधी वाढवल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकांना आता आणखी तीन वर्षे मिळत आहेत ज्यामध्ये त्यांना या योजनेत गुंतवणूक करून बँकांकडून अधिक व्याज मिळू शकेल. या योजनेंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ७.४ टक्के परतावा मिळण्याची हमी देण्यात येईल आणि ती दर वर्षी निश्चित केली जाईल.
आता किती गुंतवणूक करू शकता
प्रधानमंत्री वय वंदना योजना (पीएमव्हीव्हीवाय) या योजनेंतर्गत आपल्याला जास्तीत जास्त १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या पॉलिसीचा कालावधी हा १० वर्षांचा आहे. नवीन नियमांनुसार किमान गुंतवणूकीची रक्कम वाढवून १,५६,६५८ रुपये करण्यात आली असून यामुळे वर्षाला १२,००० रुपये पेन्शन मिळणार आहे. त्याचबरोबर दरमहा किमान १००० रुपयांच्या पेन्शनसाठी १,६२,१६२ रुपयांची गुंतवणूक निश्चित केली गेली आहे.
आताच्या हिशेबानुसार मिळणार पेन्शन
२०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ही योजना ७.४ % वर्षाकाठी परतावा देईल. या योजनेतील गुंतवणूकीवर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा किमान पेंशन १,००० मिळू शकते तर जास्तीत जास्त पेन्शनची रक्कम दरमहा १०,००० पर्यंत मर्यादित आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.