Fact Check: 10 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मिळत आहे फ्री इंटरनेट सेवा, याबातमी मागील सत्य जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजकाल व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार येत्या 3 महिन्यांसाठी फ्री इंटरनेट सेवा (Free internet Service) देईल. हा मेसेज वाचून तुम्हालाही एक क्षण धक्का बसू शकतो. वास्तविक, या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार येत्या 3 महिन्यांसाठी ऑनलाईन शिक्षणासाठी फ्री इंटरनेट सेवा देईल.

संपूर्ण मेसेज काय आहे ते जाणून घ्या
व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये असे लिहिले गेले आहे की, भारत सरकारने 100 मिलियन यूजर्सना ऑनलाईन अभ्यासासाठी 3 महिन्यांचे फ्री रिचार्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. जर आपल्याकडे जिओ, एअरटेल किंवा VI सिम असेल तर आपण या ऑफरचा लाभ घेऊ शकता. मला एक फ्री रिचार्ज मिळाला आहे, आपणही करू शकता. या मेसेज खाली एक लिंक देखील देण्यात आली आहे आणि या दिलेल्या लिंकवर क्लिक करुन रिचार्ज मिळू आहॆत असेही लिहिले आहे. तसेच ही ऑफर मर्यादित असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या मेसेज मागील सत्य काय आहे ते जाणून घ्या
व्हॉट्सअ‍ॅपच्या या व्हायरल मेसेज पूर्णपणे फेक आहे. PIBFactCheck मध्ये हा दावा बनावट असल्याचे म्हटले गेले आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही. PIBFactCheck ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,”#FraudAlert”

या व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये असाही दावा केला आहे की भारत सरकार 100 मिलियन यूजर्सना 3 महिन्यांसाठी फ्री इंटरनेट उपलब्ध करुन देत आहे. #PIBFactCheck: हा दावा #बनावट आहे. अशी कोणतीही घोषणा भारत सरकारने केलेली नाही.

फसवणुकीला बळी पडू शकाल
PIBFactCheck चे म्हणणे आहे की,” सरकारची अशी कोणतीही योजना नाही, ज्या अंतर्गत 10 कोटी लोकांना 3 महिन्यांसाठी फ्री इंटरनेट सेवा मिळणार आहे. तर मेसेज सह दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. कदाचित आपण फसवणूकीला बळी पडू शकाल.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment