केंद्र सरकारने दिलेला Health ID मिळविण्यासाठी फक्त ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल, अशी माहिती PIB ने दिली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण ही बातमी वाचली असेल की, केंद्र सरकारने जारी केलेला एक हेल्थ आयडी (Health ID) तयार करण्यासाठी आपल्याला आपली वैयक्तिक माहिती जसे की पॉलिटिकल व्यू, जाती, मेडिकल हिस्ट्री, सेक्स लाइफ या गोष्टी आपणांस सांगाव्या लागतील. तर असे कोणतेही नियम सरकारने बनविलेले नाहीत, ही बातमी अगदी खोटी आहे.

सरकार नागरिकांकडून असे कोणतेही तपशील विचारत नसल्याचे तपासात उघड आले असल्याची माहिती प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) दिली आहे.

PIB ने Fact Check वर ट्वीट केले आहे की, मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की, सरकार हेल्थ आयडीच्या नोंदणीसाठी संवेदनशील वैयक्तिक माहिती विचारत आहे. परंतु ही माहिती चुकीची आहे.

सत्य हे आहे की हेल्थ आयडीसाठी नोंदणी करताना नाव, जन्म वर्ष, राज्य इत्यादी माहिती आवश्यक असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.