प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान; केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आज प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्ली येथे शेतकर्‍यांनी ट्रेक्टर मोर्चाचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी देशातील शेतकर्‍यांनी आज दिल्लीत मोर्चा आखला होता. मात्र यावेळी पोलिस आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. यापार्श्वभुमीवर प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांवर लाठीचार्ज हा संविधानाचा अपमान. केंद्र सरकार क्रूर हुकूमशाही दर्शन घडवत आहे असा घाणाघात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

लोकशाहीच्या अत्यंत महत्वपूर्णदिनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की करणे, हे दुर्देवी आहे. हा संविधानाचा अपमान असून केंद्र सरकार क्रूर हुकूमशाहीचे दर्शन घडवत आहे. ‘शेतकरी टिकला, तरच देश टिकेल’, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावं. जय हिंद! अशा आशयाचे ट्विट गायकवाड यांनी केले आहे.

दरम्यान, देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असतानाच दिल्लीत मात्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलक शेतकर्‍यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करुन आपला झेंडा फडकवला आहे. मात्र हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत असा दावा शेतकरी संघठनांनी केला आहे.