हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात येमेन, सौदी अरेबिया नेऋत्य इराण मध्ये नाकतोड्यांची टोळधाड आली होती. तिथे त्यांचे योग्य नियोजन झाले नसल्याने ते डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर आले होते. आता भारतातील अनेक भागात पिकांवर संकट बनून या टोळधाडी थैमान घालत आहेत. मध्यप्रदेशमधून या टोळधाडी आता महाराष्ट्रातील विदर्भात आल्या आहेत. आणि तेथील पिकांवर त्यांनी आक्रमण केले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत.
अमरावती नंतर नागपूर आणि आता भंडारा जिल्ह्यात या टोळधाडी येऊन पोहोचल्या आहेत. या टोळींमुळे मोठ्या प्रमाणात कीड लागते आणि पीक खराब होते. दरवर्षी या टोळधाडी जून-जुलै मध्ये या टोळधाडी वाळवंटी प्रदेशातून भारतात येतात. यंदा त्या काही दिवस आधीच आल्या आहेत मात्र जर या कीटकांच्या अंड्यांचा नाश केला तर धोका टळू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रेताड माती तसेच ओलसर ठिकाणी यांची अंडी सापडतात. ती ठिकाणे शोधून त्यांचा नाश केला तर खरीप पिकांचे नुकसान रोखता येऊ शकते. भंडारा जिल्ह्यात सध्या या कीटकांचा नाश करण्यासाठी जंतुनाशके फवारली जात आहेत. तर मोठ्या प्रमाणात ढोल वाजवून या टोळींना हाकलवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
#WATCH Local administration in Bhandara sprays disinfectant to fight locust attack; locals beat drums to drive away the insects#Maharashtra pic.twitter.com/XxODZds90C
— ANI (@ANI) May 28, 2020
विदर्भातील काही शेतकरी आपल्या शेतात कडुलिंबाचा पाला जाळून धूर करून या किडयांना घालवू पाहत आहेत. कृषी विभागही विविध जंतुनाशके फवारत आहेत पण याचा उपयोग होत नाही आहे. भारतासह, दक्षिण आफ्रिका, इथिओपिया, पाकिस्तान, इराण या देशात यांनी थैमान घातले आहेत. या टोळधाडीत एका चौरस किमी परिसरात सरासरी ८ कोटी नाकतोडे असतात. हे एका दिवसात १५० किमी प्रवास करतात. हे नाकतोडे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.