शेतकरी आंदोलन | संत बाबा राम सिंह यांची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

त्यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटनुसार संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे.बाबा राम सिंह हे एक शेतकरी होते आणि ते हरयाणा एसजीपीसीचे नेतेदेखील होते. “मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. तो आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे,” असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

कोणीही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काही केलं नाही. अनेकांनी त्यांना मिळालेले सन्मान परत केले. हा अत्याचाराविरोधातील आवाज आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. यापूर्वी मंगळवारीदेखील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment