WhatsApp चॅट कसे लीक होतात आणि ते कायमचे डिलीट कसे करावे हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । व्हॉट्सअॅपबद्दल लोकांमध्ये संभ्रम होता की, यावरून केलेल्या चॅट डिलीट केल्यावर कोणताही रेकॉर्ड राहत नाही. पण अलिकडच्या काळात मुंबईतील अनेक बड्या फिल्मस्टार्सच्या व्हॉट्सअॅप चॅट्स लीक झाल्या आणि ज्याच्यात ड्रग्सच्या विक्रीची बाब उघडकीस आली, अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅपवरून डिलीट केल्या गेलेल्या चॅट रिकव्हर होणार नाही याबाबतीत लोकांचा संभ्रम आता दूर झालेला. व्हॉट्सअॅपवर दोन लोकांमधील चॅट तिसरा कोणीही वाचू शकत नाही. परंतु आपल्या फोनवरून डिलीट केलेले चॅट रिकव्हर केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत आम्ही आपल्याला व्हॉट्सअॅप चॅट पर्मनंट कसे डिलीट करायचे किंवा फोनमध्ये चॅट डिलीट करूनही ते सुरक्षित कसे ठेवावे हे सांगणार आहोत.

व्हॉट्सअॅप चॅटसाठी ऑथेंटिकेशन – व्हॉट्सअॅपने आपल्या ग्राहकांना ऑथेंटिकेशनची सुविधा दिली आहे. ज्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड असे म्हणतात. या ऑथेंटिकेशन कोडच्या मदतीने आपण आपल्या व्हॉट्सअॅपवर 6 अंकी कोड प्रविष्ट करू शकता. या कोडमुळे कोणताही हॅकर आपला व्हॉट्सअॅप क्लोन करू शकत नाही. जर हॅकरने व्हॉट्सअॅप क्लोन करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी ऑथेंटिकेशन कोड आवश्यक असेल आणि त्या कोडशिवाय तो आपला व्हॉट्सअॅप उघडू शकणार नाही.

व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप घेणे ही सर्वात मोठी चूक आहे – बर्‍याच वेळा व्हॉट्सअॅपमध्ये असा पर्याय असतो की आपल्याला आपल्या चॅटचा बॅकअप घ्यायचा आहे की नाही. बर्‍याच वेळा, जे लोक Google ड्राइव्ह, आयक्लाउड किंवा ई-मेल मध्ये चॅट बॅकअप ठेवतात. पण हे फीचर व्हॉट्सअॅप चॅटदेखील लीक करू शकते. व्हॉट्सअॅप चॅटचा बॅक अप घेण्यामुळे एन्ड टू एंड एन्क्रिप्शन दूर होते. म्हणजेच फक्त दोन युझर्स मधील चॅट. आता ते इतर सिस्टमवर देखील असते आणि यामुळे, ते सुरक्षित नाही. फोन मधून डिलीट केल्यानंतर आपल्याला इतरही ठिकाणाहून चॅट डिलीट करायचा असेल तर जिथे आपण गूगल ड्राईव्ह किंवा आय क्लाऊड सारख्या व्हॉट्सअॅप चॅट सेव्ह केल्या आहेत, तिथे तुम्ही ईमेल आयडीने लॉग इन करून त्या डिलीट करू शकता.

ई-मेलद्वारे व्हॉट्सअॅपशी कनेक्ट व्हा – तुम्ही तुमचा व्हॉट्सअॅप ईमेल आयडीशी कनेक्ट केलेला ठेवू शकता आणि त्या ईमेल आयडीच्या मदतीने पुन्हा व्हॉट्सअॅप चॅट रीस्टोअर करू शकता. परंतु दुसर्‍या एखाद्यास आपले डिलीट केलेले व्हॉट्सअॅप चॅट रीस्टोअर करायचे असेल तर ते करू शकणार नाहीत. कारण यावेळी त्याला तुमचा ईमेल हवा असेल जो त्यांच्याकडे नसेल. परंतु जर कोणाकडे ईमेल आयडी असेल तर त्यामुळे हॅकिंगची शक्यताही वाढते.

आपण मेमरी कार्डमध्ये व्हॉट्सअॅप चॅट घेऊ शकता – आपण आपल्या फोनवरून व्हॉट्सअॅप चॅट दिलीत करू इच्छित असाल आणि फोटो किंवा इतर काही महत्वाची माहिती सेव्ह करू इच्छित असाल तर आपण चॅट, व्हिडिओ, फोटो पेन ड्राईव्ह, हार्ड ड्राइव्ह, मायक्रो एसडी कार्ड आणि मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकता.

Android वरून iOS वर चॅट ट्रान्सफर करता येणार नाहीत – आपण Android फोन वापरत असाल आणि आयफोनवर स्विच करत असाल तर तुमचा व्हॉट्सअॅप चॅट आयफोनवर ट्रान्सफर होणार नाही. तसेच, आयफोन वरून अँड्रॉइडवरही व्हॉट्सअॅप चॅट ट्रान्सफर होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment