पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान !! न्याय मिळावा म्हणून कोर्टात जाणार; बाबाजानी दुर्रानी यांचं मोठं वक्तव्य

आमचे पुरावे व बाजू ऐकून घ्या असं सांगण्यासाठी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु आमची बाजू ऐकण्यासाठी वेळ व आमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे कृती समितीने याविषयी आता न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ठप्प पडलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने या घोषणेकडे पहिले जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.

Amazonचे मालक जेफ बेझॉस यांचा फोन हॅक? सौदीचे राजपुत्र महंमद बिन सलमानवर संशय

जगातील सर्वात मोठी इ-कॉमर्स कंपनी Amazon चे मालक जेफ बेझॉस याचा फोन हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. The Guardian या वृत्रपत्राने याबाबत वृत्त दिलेले आहे. महत्वाची बाब म्हणजे सौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान यांच्यावर बेझॉस यांचा फोन हॅक केल्याचा आरोप या वृत्तात केला गेला आहे.

बजेटपूर्वी ‘या’ तीन सरकारी कंपन्यांचे होऊ शकते विलानीकरण

येत्या २ फेब्रुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पापूर्वी तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी आर्थिक सुधारणांकडे लक्ष देतील?

Union Budget 2020 | २०१९ च्या निवडणुकीचे परिणाम संपले आहेत आणि आता सगळ्या देशाचे लक्ष 2020 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या निवडणुकी नंतर मोदी सरकारला निर्विवाद बहुमत बहाल केले आहे. निवडणुकीच्या राजकारणामुळे पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा ह्या मागे पडलेल्या मुद्यांकडे मोदी सरकार ला लक्ष द्यावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी … Read more

‘या’ कारणामुळं इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या दिवशी शनिवार असला तरी मुंबई शेअर बाजार नियमित वेळेनुसार सुरु राहणार आहे. राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सोमवार ते शुक्रवार मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज चालते. मात्र, अर्थसंकल्प सादर होत असल्याने इतिहासात पहिल्यांदाच शेअर बाजार शनिवारी सुरु राहणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी आपले दुसरे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या टीममध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीवकुमार यांच्या नेतृत्वात ही टीम अर्थसंकल्प बनवेल. सुब्रमण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार जुलैमध्ये सुब्रमण्यमच्या पहिल्या आर्थिक सर्वेक्षणात लाख कोटी रुपयांचे अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी 8 टक्के व्याधी दर साध्य करण्यासाठी आणि राखण्यासाठी अनेक निराधार … Read more

जिओचं नवीन टॉप-अप रिचार्ज; केवळ १० रुपयात मिळणार १ जीबी डेटा आणि कॉलिंग

रिलायन्स जिओनं मागील वर्षी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये बदल करत प्लानच्या किंमतीत वाढ केली होती. सोबतच जिओमधून अन्य नेटवर्कवरील अनलिमिटेड कॉलिंग बंद केली. ह्या सुविधा बंद केल्यानंतर आता अन्य नेटवर्कवर कॉल करण्यास ग्राहकांना नॉन जिओ मिनिट्सची आवश्यकता भासते. ग्राहकांची ही अडचण लक्षात घेता अशा ग्राहकांना जिओने खास ऑफर दिली आहे.

‘उबर इट्स’ला ‘झोमॅटो’नं घेतलं विकत; तब्बल २४८५ कोटी रुपयांना झाला व्यवहार

झोमॅटोनं उबर इट्सचा भारतीय व्यवसाय सुमारे ३५ कोटी डॉलर अर्थात २४८५ कोटी रुपयांना खरेदी केला आहे.

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची १ जूनपासून अंमलबजावणी- केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

एक देश एक रेशन कार्ड’ या योजनेचा पायलट प्रोजेक्ट चार राज्यांमध्ये लागू करण्यात आला होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि गुजरात या राज्यांमध्ये रेशन कार्डाच्या पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी या योजनेचं ऑनलाइन उद्घाटनदेखील केलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्याची खात्री पटल्यानेच या निर्णयाची अमंलबजावणी संपूर्ण भारतभर करण्याचा निर्णय केंद्र सरकारतर्फे घेण्यात येणार असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्पष्ट केलं आहे.