सोन्याच्या दरात घसरण सुरूच; जाणून घ्या आजचे भाव 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. संचारबंदी हटवली नसली तरी हळूहळू नियम शिथिल करून व्यवसाय सुरु केले जात आहेत. सराफ व्यवसायात यामुळे बदल होत आहेत. ते वेगाने नफावसुली करत आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. मात्र कमॉडिटी बाजारात सोन्याचा दर थोडा वधारला आहे. कोरोनाच्या संकटातून युरोप हळूहळू सावरत असल्याने तेथील संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आले आहेत आणि बँकांनी आर्थिक व्यवहार सुरु केले आहेत. याचा परिणाम कमॉडिटी बाजारावर होत आहे. असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. हळूहळू व्यवसाय सुरु झाल्याने कमोडिटी बाजारातही बदल होत आहेत. मुंबईत आज २२ कॅरेट सोने ५० रु नी घसरले. तर २४ कॅरेट सोने बुधवारच्या तुलनेत १०० रु नी घसरले आहे.

चांदी ४७९०० रु किलो झाली आहे.  देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये १ तोळा (१० ग्रॅम) सोने ४६००० झाले आहे. २४  कॅरेट सोन्याचा भाव ४७८१० रु झाला आहे. चेन्नईत सोने ९२० रु घसरले आहे. २२ कॅरेट  सोने प्रति तोळा ४४३१० रु झाले आहे. दरम्यान, दुसरीकडे कमॉडीटी बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी बाजारात (MCX) आज सकाळी सोन्याचा भाव प्रती तोळा ४६६०० रुपये होता. बुधवारच्या तुलनेत यामध्ये ०.१५ टक्के वाढ झालीआहे.

येत्या काळात सोन्याचा भाव ४७००० च्या आसपास राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बाजारात आज स्पॉट गोल्डची किंमत प्रती औस १७१२.३९ डॉलर इतकी होती. बुधवारी ती १६९३.३९ डॉलर इतकी होती. गोल्ड फ्युचर्सचा भाव १७११.४० इतकाच आहे. चलन बाजारात रुपयाची किंमत घसरत आहे म्हणून भारतात सोने महाग होते आहे. MCX वर जूनमधील सोन्याचा वायदा ४६३०० ते ४६४०० रुपयांच्या दरम्यान ट्रेड होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment