Vodafone Idea यूजर्सचा मोठा फायदा! आता 3G नेटवर्क यूजर्स होणार 4G वर अपग्रेड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्होडाफोन आयडिया लिमिटेड (Vi) आपल्या विद्यमान 3G ग्राहकांना अधिक चांगला डेटा स्पिड आणि सेवा देण्यासाठी 4G नेटवर्कवर आणेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपले 3G नेटवर्क आता 4G वर अपग्रेड केले जाईल. बिर्ला समूहाच्या कंपनीने सांगितले की, व्होडाफोन आयडिया यासाठी Vi GIGAnet Technology वापरत आहे. कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवींदर टाककर म्हणाले की,”आम्ही देशातील एक अब्ज लोकसंख्येमध्ये 4G नेटवर्क पसरविला आहे. Reliance JIO आणि Bharti Airtel ने हे काम यापूर्वीच केले आहे.

2G युझर्सना बेसिक व्हॉइस सेवा मिळणे सुरूच राहील
आयडिया व्होडाफोनने सांगितले की, आता कंपनी आपल्या Vi GIGAnet नेटवर्कवर 3G युझर्सना वेगवान 4G डेटा स्पीड देऊ शकेल. कंपनीच्या 3G-आधारित सेवा वापरणार्‍या एंटरप्राइझ ग्राहकांना 4G आणि 4G बेस्ड IoT ऐप्लिकेशंस आणि सेवांमध्ये अपग्रेड केले जाईल. कंपनी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करेल. तसेच , कंपनीच्या 2G युझर्सना पुरविल्या जाणार्‍या सेवांमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे बेसिक व्हॉइस सेवा मिळणे सुरूच राहील.

Vi च्या ग्राहकांच्या संख्येत सतत घट
एकत्र आल्यानंतर, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरने, Vi या ब्रँड नावाने इंटीग्रेटेड 4G नेटवर्क GIGAnet लॉन्च केले. अलीकडे, व्होडाफोन-आयडियाद्वारे असे म्हटले गेले आहे की, कंपनीकडे एकूण 16 की-सर्कल्स आहेत. येथे ऑपरेटर अधिक ग्राहक मिळविण्यावर आणि बाजारातील वाटा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या संख्येत होणारी घट थांबवता येईल. ट्रायच्या अहवालानुसार जून 2020 मध्ये Vi चे सुमारे 48.2 लाख युझर्स कमी झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment