मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या शॅम्पू आणि साबणाचे काय होते, जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोठ्या लक्झरिअस हॉटेलमध्ये राहायला गेलात तर, त्या हॉटेलच्या खोलीमध्ये ग्राहकांना लागणाऱ्या सर्व वस्तू ठेवलेल्या असतात. यामध्ये दात घासण्याचा ब्रश पासून ते आंघोळीच्या साबणानापर्यंत सर्वकाही ठेवलेले असते. ते सामान रोज- रोज बदलले जाते. जरी ग्राहक एकापेक्षा जास्त दिवस राहणार असेल तरीही दुसऱ्या दिवशी नवीन सामान ग्राहकांना दिले जाते. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, एक दिवस वापरल्यानंतर या साबणाचे काय केले जाते? तर जाणून घेऊ याबाबत सविस्तर.

वापरल्या गेल्या नाहीत अशा वस्तू आणि कमी वेळा वापरलेल्या वस्तू, ज्यामध्ये साबण, शाम्पू आणि टूथपेस्ट यांचा समावेश आहे. अशा वस्तू फेकून देण्याऐवजी त्या काही सामाजिक संस्थामार्फत गरीबांमध्ये वाटल्या जातात. जे लोक अशा प्रकारच्या वस्तू विकत घेऊ शकत नाहीत, अशा लोकांच्या आरोग्यासाठी त्यांना या वस्तू दिल्या जातात. मोठ्या प्रमाणात गरीब लोकांच्या आरोग्य समस्या सोडवण्याचा हा एक प्रयत्न असल्याचेही बोलले जाते.

मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था आणि एनजीओ हे काम करत आहेत. मोठ्या हॉटेलमधून अशा वस्तू जमा झाल्यानंतर त्यांची स्वच्छता केली जाते. त्या वस्तू स्वच्छ केल्यानंतर गरजवंत लोकांना त्या वाटल्या जातात. क्लीन द वर्ल्ड अशीच एक सामाजिक संस्था आहे. ज्यांनी स्वच्छतेच्या समस्या दूर करण्यासाठी ‘ग्लोबल सोप प्रोजेक्ट’ नावाने एक सायुक्त अभियान सुरू केले आहे. आणि या अभियाना अंतर्गत ते गरजवंतांना या वस्तूंचे वाटप करत असतात. तसेच, अशा अनेक संस्था आहेत ज्या हॉटेलमधून अशा वस्तूंसोबतच उरलेले जेवणही जमा करून गरजवंतांना देतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.