इंग्लंडचा ‘हा’ माजी कर्णधार पंतप्रधानांवर भडकला म्हणाला,”अशा प्रकारचा मूर्खपणा…”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी क्रिकेट बॉलमुळे कोविड -१९ चा फैलाव होऊ शकते असे म्हंटले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरील बंदी सुरू ठेवण्यास सांगितले आहे, ज्यावर माजी कर्णधार मायकेल वॉनने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

ब्रिटीश पंतप्रधानांचे विधानः जेव्हा खासदार ग्रेग क्लार्क यांनी बोरिस जॉनसन यांना क्रिकेट पुन्हा सुरू करण्याविषयी विचारले असता ते म्हणाले होते की, ‘क्रिकेटमधील समस्या सर्वांनाच समजली आहे. क्रिकेट बॉलमधून कोरोना पसरण्याचा धोका आहे. या संदर्भात मी अनेकदा वैज्ञानिकांशी बोललो आहे. आत्ता आम्ही क्रिकेट कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक काम करत आहोत. आत्ता आम्ही गाइडलाइंस बदलू शकत नाही.

 

भडकला मायकेल वॉन: जॉन्सन यांच्या या विधानावर मायकेल वॉनने ट्विटरवर लिहिले की, “प्रत्येक खेळाडूच्या खिशात हॅन्ड सॅनिटायझर आहे… जेव्हा ते बॉलला स्पर्श करतील तेव्हा त्याचा वापर करतील… हे सोपे आहे…४ जुलैला रिएक्रिएशनल क्रिकेटची सुरूवाट झाली पाहिजे… अशा मूर्खपणाची नाही. ‘

जुलै ते सप्टेंबर दरम्यान तीन मालिका खेळल्या जातीलः इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात 3 कसोटी सामन्यांची मालिका 8 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र , बोरिस जॉन्सन यांच्या वक्तव्याचा या स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडला पोहोचला असून संघाची क्वारंटाईनही पूर्ण झालेले आहे.

इंग्लंड वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध 9 सामने खेळणार आहे.
30 जुलैपासून पाकिस्तानविरुद्धची स्पर्धा: वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंड पाकिस्तान विरुद्ध घरातील 30 जुलै ते 2 सप्टेंबर दरम्यान 3 कसोटी आणि T टी -20 सामन्यांची मालिका खेळेल. इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानचे काही खेळाडू हे कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे आढळले असले तरी ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. 28 जून रोजी पाकिस्तान इंग्लंड दौर्‍यावर रवाना होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment