Wednesday, June 7, 2023

“ब्रिज” चे निर्माते … सुज्ञास अधिक सांगणे न लगे; मनसे नेत्यांकडून शरद पवार – बृजभूषण यांचे फोटो ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील जाहीर सभेतून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर व भाजप खासदार बृजभूषण सिह यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचेही सांगितले होते. त्यानंतर आता मनसेचे नेते गजानन काळे एक फोटो ट्विट केला असून त्यातून “ब्रिजचे निर्माते शरद पवार, सुप्रिया सुळे असल्याचे म्हंटले आहे.

मनसे नेते गजानन काळे यांनी आज तीन फोटो ट्विट केले आहेत. त्यांनी ट्विट केलेल्या तीनही फोटोत बृजभूषणसिंह यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार दिसत आहेत. मावळमधल्या एका कुस्तीच्या कार्यक्रमातील फोटो काळे यांनी ट्विट केले असून फोटोतून त्यांनी बृजभूषण सिह, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्याला विरोध केल्यापासून महाराष्ट्रातले राजकारण पुन्हा तापले आहे. आता आज मनसे नेते गजानन कळले यांनी एका फोटो ट्विट केल्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे. या फोटोवरून मनसे नेत्यांकडून शरद पवार व राष्ट्रवादीवर निशाणा साधण्यात आलेला आहे.

“तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान” 

दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही आज एक फोटो ट्विट केर शरद पवार त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहार कि, “तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांन विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे” अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.