चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं हेच आमच्यासाठी मोठं बक्षीस ; रहाणेच दमदार ट्विट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. अजिंक्य रहाणेची झुंजार शतकी खेळी आणि कल्पक नेतृत्वाने भारताने ऑस्ट्रेलियाला चारी मुंड्या चित केलं. भारताने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. दरम्यान, चाहत्यांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू हेच आमच्यासाठी बक्षीस आहे असं भावनिक ट्विट कर्णधार अजिंक्य … Read more

भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या गाडीला अपघात

कोटा । भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात अजहरुद्दीन हे थोडक्यात बचावले आहेत. राजस्थानच्या लालसोट कोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे. सुरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबियांसह रणथंबोरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अझरुद्दीनसोबत आलेल्या … Read more

माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक एल. शिवरामकृष्णन यांचा भाजपामध्ये प्रवेश

चेन्नई । भारताच्या आणखी एका माजी क्रिकेटपटूने राजकारणात प्रवेश केला आहे. माजी फिरकीटपटू आणि प्रसिद्ध कमेंटटेर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला. आज बुधवारी चेन्नईत भाजपमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणूक होणार आहे असून त्याआधी त्याने भाजपचे कमळ हातात घेतले. यावेळी भाजपचे राज्याचे प्रभारी सीटी रवी आणि पक्षाचे अध्यक्ष एल … Read more

चुकला तरी सांभाळून घेतो तो खरा कर्णधार ; अजिंक्य रहाणेच्या कृतीने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने झुंजार खेळी करत शतक झळकावले. शतकानंतर अजिंक्य आणखी मोठी खेळी करून टीम इंडियाला मजबूत आघाडी मिळवून देण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरला होता, परंतु दुर्दैवानं तो बाद झाला. त्याच्या सुंदर खेळीचा असा शेवट होईल, याची कल्पनाच कुणी केली नव्हती. रवींद्र जडेजाने एका धावेसाठी घाई केली … Read more

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील ‘Umpires Call’ ठरला वादग्रस्त; सचिन तेंडुलकरनं ICCकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या व दुसऱ्या सत्रात DRSचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. ‘Umpires Call’मुळे मॅथ्यू वेड व मार्नस लाबुशेन यांना जीवदान मिळालं. त्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) नाराजी व्यक्त केली. या सामन्यातील दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मॅथ्यू वेड व लाबुशेन यांच्यासाठी टीम इंडियानं DRS … Read more

अजित आगरकरसोबत BCCIचा पक्षपात? पात्रतेपेक्षा अधिक अनुभव असूनही निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव डावललं

अहमदाबाद । भारतीय क्रिकेट संघ निवड समितीच्या (BCCI Selection Committee chairman) अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची निवड करण्यात आली. निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी मुंबईकर अजित आगरकरचं (Ajit Agarkar) नाव आघाडीवर होतं. मात्र जेव्हा चेतन शर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला. अजित आगरकरकडे निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी पात्रतेपेक्षाही अधिक अनुभव … Read more

IND vs AUS:ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत प्लेइंग ११ मधून साहा, पृथ्वी शॉला डच्चू! तर ‘हे’ खेळाडू करणार डेब्यू

मेलबर्न । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ शनिवारी मेलबर्नच्या मैदानावर उतरेल. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्लेइंग-11ची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणे कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. या शिवाय चेतेश्वर पुजारा उप-कर्णधार असेल. (India Vs Australia Test Series 2020-21) दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या कसोटीत खेळलेल्या वृद्धिमान … Read more

बाबो !! चक्क एका हातानं मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’ ; व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हेलिकॉप्टर शॉट म्हटलं की आपल्याला आठवतो तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी. आयपीएल असो किंवा भारतीय संघाकडून खेळायचं असो, धोनीने हेलिकॉप्टर शॉटच्या मदतीने अनेकदा उत्तुंग असे षटकार लगावले आहेत. धोनीच्या या शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्न जगभरातील अनेक खेळाडू करतात. मॅक्सवेल, हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एका हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ … Read more

निवड समितीच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची निवड ; मराठमोळ्या आगरकरचा पत्ता कट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांची भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन जणांच्या निवड समिती सदस्यांची घोषणा केली. यामध्ये चेतन शर्मा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. तर अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती हे निवड समितीचे सदस्य असणार आहेत. निवडकर्ता पदासाठी माजी भारतीय … Read more

अजित आगरकर बनणार चीफ सेलेक्टर, बीसीसीआयने नाव केले शॉर्टलिस्ट!

नवी दिल्ली । टीम इंडियाचा नवा चीफ सेलेक्टर निवडण्याची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बीसीसीआयने निवड समितीसाठी माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्यासह एकूण 5 माजी क्रिकेटपटूंची निवड केली आहे. आगरकर व्यतिरिक्त बीसीसीआयने चेतन शर्मा, मनिंदरसिंग, नयन मोंगिया आणि एसएस दास यांची नावेही दिलेली आहेत. अजित आगरकरला चीफ सेलेक्टर म्हणून निवडण्याचे का ठरवले आहे? अजित … Read more