नवी दिल्ली । सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आज तेजी दिसून आली. आज अनेक दिवसांच्या निरंतर घटीनंतर सोन्याच्या दरांमध्ये किंचित वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (Multi commodity exchnage) वर एप्रिलमधील फ्युचर्स ट्रेडमध्ये आज सकाळी सोन्याचा भाव 239.00 रुपयांनी वाढून 48,078.00 रुपये झाला. त्याचबरोबर मार्चमध्ये चांदीचा फ्युचर्स ट्रेड 321.00 रुपयांनी वाढून 70,405.00 रुपयांवर आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर येथे सोन्यातही तेजी आहे. मंगळवारी अमेरिकेतील सोने प्रति औंस 1,842.28 डॉलरच्या दराने 12.32 डॉलरने वाढत आहे. त्याशिवाय चांदीही 0.28 डॉलरच्या तेजीसह 27.54 डॉलर पातळीवर ट्रेड करीत आहे.
राजधानी दिल्लीत 9 फेब्रुवारी 2020 रोजी सोन्या-चांदीची किंमत
>> 22 कॅरेट सोन्याची किंमत – 46190 रुपये
>> 24 कॅरेट सोन्याची किंमत – 50390 रुपये
>> चांदीची किंमत – 70200 रुपये
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 94 रुपयांची वाढ झाली. राजधानी दिल्ली मध्ये 99.9 ग्रॅम शुद्ध सोन्याचे नवीन दर आता प्रति 10 ग्रॅम, 46,877 Rs रुपये झाले आहेत.
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीची किंमत
याशिवाय दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदीच्या भावात सोमवारी किंचित वाढ झाली. आता त्याचे दर 340 रुपयांनी वाढून 68,391 रुपये प्रति किलो झाले आहेत.
तज्ञांचे मत काय आहे ते जाणून घ्या
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, बाजारातील तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सोन्याच्या 47,580 रुपये किंमतीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन ते प्रति दहा ग्रॅम 49,100 चे लक्ष्य ठेवून विक्री करुन नफा कमवू शकेल. Prithvi Finmart चे संचालक मनोज जैन यांनी Moneycontrol ला सांगितले की, सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच राहतील. सोन्याला 1858 डॉलर तर चांदीला 28.55 डॉलरचा रेसिस्टेंस फेस करावा लागू शकतो.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”