हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ- उतार (Gold Price Today) पाहायला मिळत आहेत. आज भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. आज 10 मे 2022 रोजी मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 0.16 टक्क्यांनी वाढली आहे. MCX वर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 50,970 रुपये आहे.
तर दुसरीकडे, चांदीच्या दरातही (Gold Price Today) आज तेजी दिसून येत आहे. MCX वर आज चांदीचा भाव 393 रुपयांनी वाढून 61,890 रुपये प्रति किलो झाला. चांदीच्या किंमतीत प्रति किलो 0.63 टक्के वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : (Gold Price Today)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,500 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,380 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,500 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?-
साधारणतः नागरिक सोन्याचे (Gold Price Today) दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-
सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
हे पण वाचा :
Whatsapp Features : व्हॉट्सअॅप आणणार 3 दमदार फीचर्स; Movies सुद्धा शेअर करता येणार
आर्थिक नियोजनासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; होईल भरपूर फायदा
स्वप्नातील घर महागणार!! ‘या’ बँकेने गृहकर्जावरील व्याज वाढवले
PNB च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी!! कर्जावरील व्याजदरात वाढ
PM Kisan : शेतकऱ्यांना 11वा हप्ता मिळण्यास होतो आहे उशीर, यामागील कारण तपासा