हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येतो आहे. मंगळवारी देशी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 51 हजार रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी घसरून 50,803 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. त्याचबरोबर चांदीचा डिसेंबर वायदा देखील 0.6% ने घसरून 67,850 प्रती किलो झाला. तज्ज्ञांचे याबात असे म्हणणे आहे की, भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे देशांतर्गत सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमती कमी होण्याची आशा आहे. जर रुपयामध्ये थोडी जरी वसुली झाली तर सोन्याच्या किंमती खाली येऊ शकतात.
सोमवारी सोन्याचे दर वाढले होते
सोमवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 258 रुपयांनी वाढल्या. यानंतर आता सोन्याची नवीन किंमत प्रति 10 ग्रॅम 51,877 रुपयांवर पोहोचली आहे. याआधी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 51,619 रुपयांवर बंद झाले होते. चांदीची किंमत प्रति किलो 837 रुपयांवर गेली होती. तो 69,448 रुपये प्रति किलोच्या पातळीवर गेला. याआधी चांदीचा दर प्रतिकिलो 68,611 रुपयांवर बंद होता. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत औंस 26.93 डॉलर होती.
मागील सत्रात सोन्याचा वायदा 0.7 टक्क्यांनी वाढला. सोमवारी चांदीच्या फ्युचर्समध्ये 1.6 टक्क्यांनी वाढ झाली. मागील महिन्याच्या उच्च पातळीच्या तुलनेत सोन्याचा भाव सुमारे 5000 रुपयांनी तर चांदीच्या किंमती 10,000 रुपयांनी स्वस्त आहे.
आता काय होईल ?
तज्ञांचे असे म्हणणे आहे की,देशात आणि जगात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढतच आहेत तसेच अमेरिका आणि चीनमधील तणावही वाढतच आहे. भारत आणि चीनसारख्या मोठ्या बाजारात ग्राहकांची मागणी खूपच कमी झाली आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमती एका श्रेणीतच राहू शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”