नवी दिल्ली । जर आपणही बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे आता चांगली संधी आहे… सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या FD चे व्याज दर वाढविले आहेत. म्हणजेच आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. बँकेने आपल्या व्याजदरात 0.2 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीव व्याजाचा लाभ ज्या ग्राहकांनी किमान दोन वर्षांसाठी एफडी केली आहे त्यांना देण्यात येईल.
आता इतके व्याजदर आहेत
कॅनरा बँकेच्या म्हणण्यानुसार, या वाढीनंतर आता कमीतकमी 2 वर्ष आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.4% व्याज मिळणार आहे. पूर्वी हा व्याजदर 5.2 टक्के होता. त्याशिवाय 3 ते 10 वर्षाच्या मॅच्युरिटीच्या एफडीवरील व्याज दर 5.3 वरून 5.5 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
27 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू
बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुधारित व्याज दरांवर ज्येष्ठ नागरिकांना दीड टक्के अधिक व्याज दिले जाईल. हे नवीन दर 27 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. व्याज दरात सुधारणा झाल्यानंतर 2 ते 10 वर्षांच्या एफडीवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कॅनरा बँक ही सर्वाधिक व्याज देत आहे.
एचडीएफसी बँकेने व्याज दर केले कमी
खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने काही कालावधीच्या एफडीवरील व्याज दरात कपात केली आहे. एचडीएफसी बँकेने व्याजदरात 0.20 टक्क्यांनी घट केली आहे. बँकेच्या 1 वर्षाच्या एफडीवरील व्याज दरात 0.20 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्याच वेळी, 2 वर्षाच्या एफडीवरील व्याज दरात बँकेने 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे.
या नवीन दरानुसार एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या डिपॉझिट्सवर 2.50% व्याज देत आहे. हा दर 30-90 दिवसात मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 3% आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.