हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनामुळे अनेक लोकांचे जीव गेले आहेत. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेत अजूनही वाढ होत आहे. कोरोनावरती अजूनही कोणते औषध सापडले नाही सर्व जग कोरोनाचे उपचार शोधण्याच्या तयारीत आहे.अनेक चाचण्या सुरु झाल्या आहेत. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे. त्यांना पुन्हा नव्याने कोरोना होत नाही.
काही दिवसांपूर्वी ज्यांना कोरोना झाला होता. त्या लोकांच्या बॉडीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनावर मात करणाऱ्या अँटीबॉडी तयार केल्या जातात. त्यामुळे पुन्हा नव्याने संक्रमण होत नाही. कोरोना बाबत हा सकारात्मक दावा वाशिंग्टन च्या संशोधकांनी केला आहे. व्हायरॉलॉजी लॅब मधील सहाय्यक निर्देशक अलेक्झांडर ग्रेनिजेर आणि फ्रेंड हच कॅन्सर च्या संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे.
हा सर्वे सरोलॉजिकल सर्वे आणि RT PCR Test द्वारे करण्यात येते. अमेरिकेतील मासे पकडणाऱ्या एका जहाजाचा वापर कोरोना च्या रुग्णांच्या तपासणीसाठी करण्यात आला होता. त्या जहाजामध्ये १२२ लोकांचा समावेश होता. अठरा दिवसांच्या प्रवासासाठी निघण्यात आल्या होत्या लोकांपैकी १०४ लोकांचा समावेश कोरोना संक्रमित मध्ये करण्यात आला होता. संपूर्ण जहाज हे कोरोना ग्रस्त असताना सुद्धा फक्त तीन लोकांना कोरोना झाला नाही. त्याचा संबंध हा कोरोनाच्या अँटी बॉडी मध्ये असलेल्या बॅक्टरीया मध्ये करण्यात आला होता. कोरोनाला रोखण्याचे प्रमाण कोणत्याही लसीमध्ये ५० टक्के जरी असले तरी त्यामधून अनेक लोकांना वाचवू शकतो. असे मत अमेरिकेच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.